Paneer Tikki Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Recipe: फक्त बटाटाच नाही तर पनीर टिक्कीचाही घेऊ शकता आस्वाद, नोट करा रेसिपी

तुम्ही बटाट्यापासून बनवलेली टिक्की खाऊन बोरं झाले असाल तर घरीच घ्या पनीर टिक्कीचा आस्वाद.

Puja Bonkile

Paneer Tikki Recipe: तुम्ही बटाटा टिक्की खाऊन बोरं झाले असाल तर पनीर टिक्कीचा आस्वाद घेऊ शकता. पनीर हे फक्त खायलाच नाही तर आरोग्यदायी देखील मानले जाते. त्यामुळे पनीरपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. कधीकधी पनीरची भाजी बनवण्यासाठी खुप वेळ लागतो. पण तुम्ही पनीरपासून झटपट तयारी होणारी डिश म्हणजेच पनीर टिक्की तयार करू शकता. जी खायला चवदार आणि पौष्टीक आहे. ही डिश बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची पनीर टिक्की

  • पनीर टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

हिरवी मिरची - 3

जिरं- 1 टीस्पून

बेसन - अर्धी वाटी

काजू - 1 टीस्पून

काळे मीठ - 1 टीस्पून

लिंबाचा रस - 1 टीस्पून

तूप - १ चमचा

मीठ - चवीनुसार

Paneer Tikki
  • कृती

पनीर टिक्की बनवण्यासाठी सर्वात पहिले पनीर स्वच्छ धुवावे आणि बारिक खिस करावा.

नंतर त्यात तिखट, हिरवी मिरची, काळं मिरं आणि काजू पावडर असे सर्व मसाले घालून मिक्स करावे.

हे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर त्यावर बेसन आणि तूप घालून टिक्की बनवावी. टिक्की झाल्यावर एका प्लेटमध्ये ठेवावे.

नंतर एका पॅनमध्ये मंद आचेवर तेल गरम करावे. नंतर टिक्की तपकिरे होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे.

नंतर एका प्लेटमध्ये काढून लाल आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.

टिप: तुम्ही बटाटा देखील वापरू शकता .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT