Rashi Bhavishya in Marathi | Daily Horoscope 13 October 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rashi Bhavishya in Marathi: नवीन मित्र बनवताना सावधान! वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 13 October 2023: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील.  (Daily Horoscope 13 October 2023)

  • वृषभ

प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.(Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. 

  • कर्क

तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. 

  • सिंह

दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

  • कन्या

तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल - परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. 

  • तुळ

नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरु करण्याची आत्यंतिक गरज आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील, मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. 

  • वृश्चिक

धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियातील लोकांना मानवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

  • धनु

प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

  • मकर

नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरु करण्याची आत्यंतिक गरज आहे. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. 

  • कुंभ

धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. 

  • मीन

छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT