Rashi Bhavishya 27 February 2024 in Marathi | Daily Horoscope  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rashi Bhavishya 27 February 2024: 'या' राशीच्या लोकांनी लांबचे प्रवास टाळा! वाचा तुमचे पूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope 27 February 2024: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar

Rashi Bhavishya 27 February 2024 in Marathi

  • मेष

तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. (Daily Horoscope 27 February 2024)

  • वृषभ

आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती. (Rashi Bhavishya in Marathi) 

  • मिथुन

मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल - म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका, कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत

  • कर्क

कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

  • सिंह

प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा - मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. 

  • कन्या

आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात परंतु, संद्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाइक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो.

  • तुळ

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजीसुद्धा घेतात. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. 

  • वृश्चिक

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. 'सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. 

  • धनु

तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहका-यांवर तुम्ही वैतागाल.

  • मकर

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे - त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि चपळाईने कृती केली तर इतरांच्या थोडे वर राहू शकाल.

  • कुंभ

हाताखालच्या सहका-यांच्या उपयुक्त सूचना लक्षपूर्वक ऐकून घ्या. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे जर, तुम्ही असे केले नाही तर, तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील.

  • मीन

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल म्हणून, आज पासूनच आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT