Raksha Bandhan 2021 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2021: कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाची बांधावी राखी

ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी दोन विशेष शुभ मुहूर्त आहेत.

दैनिक गोमन्तक

रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा भाऊ - बहिणीसाठी विशेष असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी (Life) प्रार्थना करते. भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधून संरक्षणाचे वचन घेते. यासाठीच दरवर्षी राखी (Rakhi) बांधण्याची परंपरा आहे. राहू आणि भद्रा काळात राखी बांधने टाळावे. या वर्षी राखी 22 ऑगस्टला आहे. 23 ऑगस्टला भद्रा काळ सकाळी 5:34 ते 6:12 पर्यंत असेल. यामुळे रक्षाबांधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी बहिणी दिवसभरात कोणत्याही वेळी भावाला राखी (Rakhi) बांधू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी दोन विशेष शुभ मुहूर्त आहेत. जाणून घेवूया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाची (Colour) राखी बांधावी.

* मेष आणि वृश्चिक रास असलेल्या लोकांनी लाल रंगाची राखी बांधावी.

* वृषभ आणि तूळ रास असलेल्या लोकांनी पांढऱ्या रंगाची बांधावी.

* कर्क आणि सिह रास असलेल्या लोकांनी गुलाबी रंगाची राखी बांधावी.

* धनु आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची राखी बांधावी.

* मकर आणि कुंभ रास असलेल्या लोकांनी तपकिरी रंगाची राखी बांधावी.

* पंचांगानुसार राखी बांधण्याची अचूक वेळ

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळची 6:15 ते 10:34 ही वेळ योग्य मानली गेली आहे. तर धनिष्ठा योग संध्याकाळी 7:40 पर्यंत राहील.या वेळात राखी बांधणे सर्वोत्तम मानले जाते.

* पौर्णिमेची सुरुवात: 21 ऑगस्ट दुपारी 3:45

* पौर्णिमेची समाप्ती : 22 ऑगस्ट संध्याकाळी 5:58

* साहित्य: भावाला ओवाळतांना अक्षत, दिवा, मिठाई, कुंकु, राखी ठेवून सजवावी. त्याचप्रमाणे राशीनुसार राखी आणि मिठाई वापरणे शुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

SCROLL FOR NEXT