Raisins Health Benefits  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raisins Benefits : मनुके खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या दिवसात किती मनुके खावेत

रोज बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत

दैनिक गोमन्तक

तुमच्या आहारात बेदाणे अवश्य समाविष्ट करा. रोज बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मनुका अतिशय स्वस्त, आरोग्यदायी आणि चवदार असतात. सर्वात स्वस्त सुक्या मेव्यामध्ये याचा समावेश होतो. द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात.

यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. बेदाण्यामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कॉपरची कमतरता दररोज मनुका खाल्ल्याने पूर्ण होऊ शकते. मनुका खाल्ल्याने शरीराला भरपूर अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मिळतात. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट देखील मनुकामध्ये आढळतात. मनुका जरूर खा. (Raisins Health Benefits)

मनुका खाण्याची योग्य पद्धत

तसे तर तुम्ही मनुके असेच खाऊ शकता, पण त्याचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी मनुके भिजवून खावे. मनुका रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. अशाप्रकारे मनुका खाल्ल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते. याने सर्व पोषक तत्व शरीराला उपलब्ध होतात.

दिवसात किती मनुके खावेत?

मनुके खायला खूप चविष्ट असतात, पण जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढून रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. तुम्ही रोज फक्त 5 ते 10 मनुके खावेत.

फायदे

  • मनुका खाल्ल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.

  • भिजवलेले मनुके खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यातून लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक मिळतात.

  • यामधून कॅल्शियम मिळते, त्यामुळे हाडे आणि दात निरोगी राहतात.

  • पुरुषांनी मनुका खावे. मनुका मधासोबत खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढते.

  • दात आणि हिरड्यांमधील पोकळी दूर करण्यासाठीही मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT