Muli Kofta Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Muli Kofta: चटपटीत मुळ्याचे कोफ्ते ट्राय केलेत का?

Health and Food: मुळ्याचे कोफ्ते चवदार असून आरोग्यदायी असतात.

दैनिक गोमन्तक

Muli Kofta Recipe: हिवाळ्यात मुळा खाणे आरोग्यदायी असते. मुळा हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आपण मुळा कोशिंबीर, लोणचे किंवा पराठ्यात टाकून आस्वाद घेत असतो. काही लोकांना मुळ्याच्या फायद्यांबद्दल माहिती असते, पण मुळ्याची चव आवडत नाही. मुळ्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवून तुम्ही त्याचा आहारातही (Diet) समावेश करू शकता. तुम्ही मुळ्याचे कोफ्ते बनवून खाऊ शकतो. हे कोफ्ते खायला चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी असतात. 

  • मुळ्याचे कोफ्ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मुळा

  • डाळीचे पीठ

  • टोमॅटो

  • हिरवी मिरची

  • हिरवी धणे

  • गरम मसाला

  • आले

  • लसूण

  • मिरची पावडर

  • हळद

  • धणे पावडर

  • जिरे

  • हिंग

  • मीठ

  • तळण्यासाठी तेल

  • मुळा कोफ्ता बनवण्याची पध्दत

  • मुळा कोफ्ते बनवण्यासाठी दोन पांढऱ्या मुळ्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात म्हणजे त्यातील माती निघून जाईल. 

  • नंतर मुळा सोलून किसून घ्या.

  • मुळ्याला पाणी सुटते, म्हणून पाणी काढून टाकण्यासाठी ते पिळून घ्या.

  • किसलेला मुळा एका भांड्यात काढा आणि त्यात मसाले मिक्स करावे.

  • आता त्यात 4-5 चमचे बेसन घालून कोफ्त्याची पेस्ट बनवा.

  • कढईत तेल टाकून त्यात छोटे कोफ्ते टाकून तळून घ्या.

  • भाजी कशी बनवायची

  • भाजी बनवण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करा.

  • आलं आणि लसूण बारीक करून प्रत्येकी एक चमचा बारीक पेस्ट बनवा.

  • 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्या.

  • तेल गरम झाल्यावर त्यात थोडे जिरे आणि हिंग टाका.

  • यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट घालून परता.

  • टोमॅटो तळून झाल्यावर त्यात हळद, धणे आणि तिखट घालून भाजून घ्या. 

  • आता त्यात घट्ट आणि ताजे दही घाला. काही वेळाने त्यात पाणी घालून शिजू द्या.
    नंतर सर्व कोफ्ते मिक्स करा

  • आता पॅनमध्ये मीठ आणि गरम मसाला घाला. 

  • भाजीवर झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजू द्या. 

  • मऊ आणि चविष्ट कोफ्ते काही वेळात तयार होतील.

  • कोफ्त्यांना हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT