Protein Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Protein Diet: पोष्टिक पदार्थांचे अतिसेवन ठरू शकते हानिकारक

Healthy Tips: अतिपोष्टिक पदार्थ खाणाऱ्यासाठी हि महत्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

निरोगी आरोग्यासाठी (Healthy) अनेक लोक प्रथिनयुक्त आणि पोषक पदार्थांचे सेवन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का या पदार्थांचे अतिसेवन देखिल शरिरासाठी घातक ठरू शकते. वजन कमी करण्‍यासाठी किंवा शरीर मजबूत करण्‍यासाठी प्रथिने घेणे खूप गरजेचे आहे. चांगले केस आणि वजन कमी (Weight) करण्यासाठी आहारात अधिकाधिक प्रथिनांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जात असला, तरी प्रथिनयुक्त आहार जास्त घेणे आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

कोणत्या समस्या निर्माण होउ शकतात

  • लठ्ठपणाची समस्या

काही लोकांचा असे मानने आहे की प्रथिनांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते,पण त्यासाठी प्रथिने मर्यादित प्रमाणातच घ्यावीत. आहारात (Food) जास्त प्रथिने घेतल्यास लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त प्रथिने खाल्ले तर ते तुमच्या शरीरात चरबीच्या रूपात जमा होईल, ज्यामुळे तुम्हाला लठ्ठपणाची समस्या होऊ शकते.

  • बद्धकोष्ठता

प्रथिने हे उच्च उष्मांक असते. जे पचण्यास खूप कठीण असते आणि जेव्हा ते नीट पचले नाही तर तुम्हाला पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता सारखे आजार होऊ शकतात. जास्त प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने शरीरात बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते.

  • डिहायड्रेशन

जेव्हा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते तेव्हा शरीराला त्याच प्रमाणात पाण्याची गरज असते.पाणी योग्य प्रमाणात न घेतल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शरीरातील प्रथिनांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

  • किडनीचे नुकसान

जास्त प्रमाणात प्रोटीनमुळे किडनीमध्ये (Kidney) समस्या निर्माण होऊ शकतात.जेव्हा जास्त प्रथिने शरीरात जातात तेव्हा किडनीला नायट्रोजन काढून टाकण्यात खूप अडचण येते. त्यामुळे डॉक्टर किडनीच्या समस्या असलेल्या लोकांना प्रोटीनपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

  • हाडे कमकुवत होणे

प्रथिने जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील हाडांच्या (Bones) आरोग्यावर परिणाम होतो.हाडे कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि कॅल्शियमची कमतरता यांसारखे आजार होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT