गर्भवती महिलांनी 'या' 4 गोष्टी करणे टाळाच Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गर्भवती महिलांनी 'या' 4 गोष्टी करणे टाळाच

गर्भधारणेदरम्यान, बाळाचे आरोग्य आणि आयुष्य आईवर अवलंबून असते.

दैनिक गोमन्तक

गर्भावस्थेत (Pregnant) महिलांनी घरातील कामे करणे हे योग्य मानले जाते. परंतु या काळात महिलांनी (Women) काही कामे न करणे आरोग्यासाठी (Health) चांगले असते. गर्भधारणे दरम्यान महिलांचे वजन (Weight) वाढते. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेदरम्यान, बाळाचे (Baby) आरोग्य (Health) आणि आयुष्य (Life) आईवर अवलंबून असते. गर्भवती महिला (Pregnant women) काय खातात किंवा काय पितात प्रत्येक गोष्टींचा फरक पडतो. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा गर्भधारणेमध्ये गुंतागुंत (Complications) वाढू शकते.

* गर्भधारणे दरम्यान महिलांनी कोणत्याही प्रकारचे जड काम करणे टाळावे. फर्निचर हलविणे किंवा टेबल हलविण्याचे काम अनेक महिला या काळात करतात. परंतु हे काम सामान्य आहे असे समजू नये. असे काम केल्यास गर्भवती महिलांना दुखापत होऊन गर्भधारणेमध्ये गुंतागुंत वाढू शकते.

* गर्भधारणे दरम्यान बराच वेळ उभे राहू नये. वस्तविक या काळात मुलाचे वजन वाढल्यामुळे, पोटावर दबाव येतो आणि पायावर सूज येऊ लागते. या काळात जास्त वेळ उभे राहिल्याने पाय दुखणे आणि पाठदुखीची समस्या वाढू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी जास्त वेळ उभे राहणे टाळावे.

* गर्भधारणे दरम्यान महिलांनी खाली वाकणे धोकादायक असू शकते. म्हणूनच झाडणे, पुसणे आणि कपडे धुणे यासारखे कामे करणे टाळावे. महिलांना जर कोणते काम करतांना अडचण येत असेल तर त्या वेळी ते काम करणे टाळावे.

* गर्भवती महिलांनी स्टूल किंवा शिडीवर चढणे टाळावे. या काळात तुमचे वजन वाढलेले असते. यामुळे तुमच्या शरीराचे संतुलन थोडे बिघडले तर तुमच्यासह तुमच्या बाळाला देखील धोका पोहोचू शकतो. तसेच गर्भधारणेमध्ये गुंतागुंत वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT