Pizza Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pizza Benefits: काय सांगता? चक्क पिझ्झा खाल्ल्याने 'हा' आजार होतो बरा; विश्वास बसत नाही? मग हे वाचाच

पिझ्झा हा एक अस्वास्थ्यकर फास्ट फूड मानला जातो

Kavya Powar

Pizza Benefits: पिझ्झा हा एक अस्वास्थ्यकर फास्ट फूड मानला जातो. तो खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतोच, शिवाय मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजारही होऊ शकतात, असे सांगितले जाते.

पण पिझ्झा खाल्ल्याने एखाद्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पिझ्झा खाल्ल्याने तुम्हाला संधिवात किंवा संधिवाताच्या समस्यांपासून आराम मिळतो.

या अभ्यासात असे म्हटले आहे की जर पिझ्झा ताज्या घटकांसह तयार केला असेल तर तो संधिवाताशी संबंधित काही समस्या कमी करू शकतो. NHS च्या मते, संधिवात हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे.

जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशींवर हल्ला करते तेव्हा हा त्रास एखाद्याला सुरू होतो. सूज आणि वेदना सुरू होतात. संधिवातामध्ये लोकांना सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. या आजारावर सध्या कोणताही इलाज नाही. तथापि, या आजाराशी संबंधित जोखीम लवकर ओळखून आणि योग्य उपचाराने वेदना कमी करता येतात.

पिझ्झा खाल्ल्याने वेदना कमी होतात!

इटालियन शास्त्रज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा अर्धा पिझ्झा खाल्ल्याने संधिवाताचा त्रास 80 टक्क्यांपर्यंत कमी होतो. कारण पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही घटकांमध्ये वेदना दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

पिझ्झा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे मोझरेला चीज आणि ऑलिव्ह ऑईल सर्वात फायदेशीर मानले गेले आहे.

संधिवात असलेल्या रुग्णांनी काय खावे?

संशोधनानुसार, ज्यांनी आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा अर्धा पिझ्झा खाल्ले त्यांना सांधेदुखीपासून आराम मिळाला. गंभीर संधिवात असलेल्या लोकांमध्ये ज्यांनी समान प्रमाणात पिझ्झाचे सेवन केले त्यांच्या वेदनांमध्ये 80 टक्के घट झाली.

जगात दरवर्षी लाखो लोकांना संधिवाताचा त्रास होतो. त्याच्या उपचारासाठी स्टिरॉइड्स आणि फिजिओथेरपी सारखी औषधे वापरली जातात. NHS या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना दाहक-विरोधी आहार घेण्याची शिफारस करण्यात येते. ज्यामध्ये फळे, भाज्या, नट, शेंगा, तृणधान्ये, बीन्स, ऑलिव्ह ऑइल आणि मासे इ. समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT