Periods Pain Remedy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Periods Pain Remedy: पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना 'हे' 3 हर्ब दहा मिनिटांत करतील दूर

मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदांवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला पेनकिलर घेण्याची गरज पडणार नाही.

Puja Bonkile

Periods Pain Remedy: मासिक काळातील वेदना खूप असह्य असतात. रक्तस्राव जास्त झाल्यास हा त्रास अधिक दुहेरी होतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान कंबर आणि पोटदुखीची समस्या जास्त असेल तर काही हे औषधी वनस्पती तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरतील.

मासिक पाळीत चिडचिड होणे, मूड बदलणे आणि ओटी पोटात दुखणे यासारख्या समस्या सामान्य आहेत. 5 दिवस शरीरावर आणि मनावरही खूप ताण असतो. पण मासिक पाळीमधील वेदना सहन करण्याची गरज नाही. आहार, औषधी वनस्पती आणि विशिष्ट खनिजांसह नैसर्गिक उपायांमुळे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या देवना सहन करण्याची गरज नाही.

  • ओवा

ओवा खाल्याने मासिक पाळी नियमित येते. तसेच होणाऱ्या वेदना कमी होतात. ओवामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते. त्यात भरपूर लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी देखील असते. मासिक पाळीच्या वेळी महिला पोट फुगीची तक्रार करतात. पण ओवा खाल्यास या समस्या कमी होतात.

  • बडीशेप

बडीशेप तुमच्या गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देऊन मासिक पाळीतील अस्वस्थता कमी करते. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक कप कोमट पाण्यात बडीशेप टाकायची आहे. यानंतर त्यात मध घालून दिवसातून तीन वेळा सेवन करायचे आहे. यामुळे रक्तस्त्राव नियंत्रित होईल आणि मासिक पाळीचा त्रास कमी होईल. तुम्हाला पेनकिलरची गरज भासणार नाही.

  • आलं

आलं मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेले प्रोस्टॅग्लॅंडिन मासिक पाळीत होणारी अस्वस्थता आणि स्राव कमी करण्यास मदत करते. जर्नल पेन मेडिसिनच्या अहवालानुसार, ते शरीरातील कोणत्याही संभाव्य जळजळांना प्रतिबंधित करते आणि वेदना कमी करणारे म्हणून कार्य करते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT