Papaya Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Papaya Side Effects: पपई आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी 'या' लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये; वाचा

पपई खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी काही लोकांना नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

Papaya Side Effects: पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये ऊर्जा, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, मॅंगनीज, तांबे, सेलेनियम, जीवनसत्त्वे यांसह अनेक पोषक तत्वे असतात.

यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. यासोबतच पपई खाल्ल्याने वजनही कमी होते. पपईमध्ये हृदय मजबूत करण्याची क्षमता देखील आहे. पण जास्त पपई खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळेच काही लोकांनी पपईचे सेवन कमी केले पाहिजे. असे काही आजार आहेत ज्यामध्ये पपई खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

1. ऍलर्जी

WebMD मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, काही लोकांना कधीकधी पपईची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पपई खाल्ल्यानंतर मळमळ किंवा चक्कर येत असल्यास पपई खाऊ नये. तथापि, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही.

2. गर्भधारणेदरम्यान

गरोदरपणात चुकूनही पपईचे सेवन करू नये. कच्च्या पपईमध्ये लेटेकचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे गर्भाशयाच्या भिंतीमध्ये आकुंचन वाढू शकते. पपईमध्ये असलेले पपेन शरीरातील पेशींच्या पडद्याचे नुकसान करते. गर्भात वाढणाऱ्या मुलाच्या विकासासाठी हे हानिकारक असू शकते. यामुळेच गर्भवती महिलांना पपई न खाण्यास सांगितले जाते.

3. उलटीची समस्या

पपई खाल्ल्याने अनेक वेळा मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. कच्च्या पपईमध्ये लेटेक्स असते, ज्यामध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते आणि मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

4. पचनाच्या समस्या

पपई हे पचनासाठी खूप चांगले मानले जाते. पपईमध्ये भरपूर फायबर असते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते, परंतु ज्यांना आधीच पचनाची समस्या आहे त्यांचे पचन देखील बिघडू शकते. पपईमध्ये असलेल्या लेटेक्समुळे देखील पोटदुखी होऊ शकते. यामुळे अतिसार देखील होऊ शकतो. त्यामुळे पपईचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT