Paneer Sandwich, Evening Snacks Recipe in Marathi, Paneer Sandwich recipe in Marathi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: संध्याकाळच्या नाश्त्यात चहा सोबत घ्या 'पनीर सँडविच' चा आस्वाद

Paneer Sandwich पनीर सँडविच चवदार असून आरोग्यदायी देखील आहे.

दैनिक गोमन्तक

रोज संध्याकाळी नाश्त्यात वेगळ काय करायच असा प्रश्न प्रत्येक महिलेला (Women) पडतो. लहान मुलांच्या बाबतीत तर खाण्या-पिण्याबाबत सर्वात जास्त गोंधळ उडतो.यासाठी पोषक आणि झटपट तयार होणारे पनीर सँडविचची (Paneer Sandwich) रेसिपी आम्ही सांगणार आहोत. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हे पनीर सँडविच आवडीने खातील. यामध्ये पनीर (Paneer) आणि इतर भाज्या असल्याने शरीरसाठी पोषक असते. (Evening Snacks Recipe in Marathi)

* साहित्य

  • ब्रेड स्लाइस 6

  • 1/2 कप किसलेला चीज

  • एक बारीक चिरलेला कांदा

  • एक बारीक चिरलेला टोमॅटो

  • एक टीस्पून आले

  • लसूण पेस्ट

  • एक टीस्पून लाल तिखट

  • अर्धा टीस्पून गरम मसाला

  • एक टीस्पून चाट मसाला

  • एक टीस्पून टीस्पून जिरे

  • एक चमच हळद

  • आवश्यकतेनुसार लोणी

  • एक चमच बारीक चिरलेली कोथिंबीर

  • एक चमच तेल

  • चवीनुसार मीठ

* कृती

पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वात पहिले एका पॅनमध्ये तेल टाकून गरम व्हायला ठेवावे. नंतर त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा टाकावा. यानंतर आल लसूण पेस्ट घालून एक मिनिट शिजु द्यावे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकावे. यानंतर त्यात हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, चाट मसाला टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे. नंतर याट् किसलेले चीज टाकावे. नंतर पनीर टाकावे आणि गॅस बंद करावा. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यावर थोडे बटर घालून त्यावर ब्रेडच्या स्लाईस ठेवा. या स्लाइसवर चीजचे स्टफिंग टाकून त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस झाकून ठेवा. नंतर वरुन बटर लावून सँडविचला दोन्ही बाजूंनी पलटून सोनेरी होईपर्यंत बेक करावे. यानंतर गरमागरम चविष्ट सँडविच सॉस ,चटणी किंवा किंवासोबत आस्वाद घेऊ शकता. (Paneer Sandwich Recipe in Marathi )

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT