Pain During Sexual Intercourse Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: लैंगिक संबंधावेळी तुम्हालाही वेदना होतात? मग असू शकतात ही कारणे, वेळीच...

वेदनादायक लैंगिक संबंध तुमच्या नात्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतो.

दैनिक गोमन्तक

Pain During Sexual Intercourse : जोडीदारांमधील संभोग हा नेहमी रोमांचक आणि आनंददायक असावा. परंतु काही वेळा तो इतका मजेदार नसतो आणि हा अनुभव वेदनादायक असू शकतो.

वेदनादायक लैंगिक संबंध तुमच्या नात्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. खूप दिवसांनी सेक्स केल्याने देखील वेदना होऊ शकतात. वेदना होण्यामागील कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घ्या.

लैंगिक संबंधावेळी या कारणांमुळे वेदना होऊ शकतात :

1. योनीतील कोरडेपणा

जर योनीमध्ये कोरडेपणा असेल तर नक्कीच संबंध ठेवताना वेदना होऊ शकतात. दीर्घकाळ जर तुमच्या नात्यात संबंध आले नसतील तर असा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ संभोग न केल्यावर योनी आकुंचन झाल्यामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात.

2. योनीतील संसर्ग

तुमच्या योनीमध्ये संसर्ग झाला असेल तर लैंगिक संबंधावेळी किंवा त्यानंतर तुम्हाला वेदना जाणवू शकतात. अनेकदा अशावेळी योनीतून रक्तही येऊ शकते. याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर योनीमध्ये आधीच जळजळ, वेदना होत असतील तर काही काळ लैंगिक संबंध ठेऊ नये. असे केल्याने त्रास आणखी वाढू शकतो. संसर्ग पूर्ण बरा झाल्यानंतर संबंध ठेवायला हरकत नाही.

लैंगिक संबंधावेळी वेदना टाळण्यासाठी हे उपाय वापरा

  • वंगण वापरा

लैंगिक संबंधादरम्यान वेदना टाळण्यासाठी सर्वात सोप्या मार्गांपैकी एक म्हणजे पुरेसे वंगण असल्याची खात्री करणे. जर तुम्हाला वंगणाची कमतरता जाणवत असेल, जी अनेकदा गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीनंतर उद्भवते, तर पाणी-आधारित सिंथेटिक वंगण तुम्ही वापरू शकता.

  • घाई टाळा

संबंधावेळी जास्त घाई करू नका; कारण त्यामुळे वेदना आणखी वाढू शकतात. यासाठी फोरप्ले करणे ही चांगली कल्पना आहे, जास्त काळ फोरप्ले केल्याने तुमचे नैसर्गिक वंगण स्त्रवले जाते. अशावेळी दोघांनी उत्तेजित होण्यासाठी एकमेकांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.

Disclaimer: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT