Goa Entertainment: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Entertainment: गोव्यातील ‘नोमोझो’ म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच!

Goa Entertainment: पर्वरी येथील ‘सर्विस रोड’वर आयोजित होणाऱ्या ‘नोमोझो’ (नो मोटर झोन)ची 5 वी आवृत्ती यंदा 29 जानेवारी रोजी पार पडली.

Shreya Dewalkar, दैनिक गोमन्तक

Goa Entertainment: पर्वरी येथील ‘सर्विस रोड’वर आयोजित होणाऱ्या ‘नोमोझो’ (नो मोटर झोन)ची 5 वी आवृत्ती यंदा 29 जानेवारी रोजी पार पडली. वेगवेगळ्या मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या ह्या उपक्रमातून, एरवी रहदारीने व्यस्त असलेल्या या रस्त्यावर वेगळे मानवी चैतन्य निर्माण झाले होते.

लहान मुलांपासून  वयस्करांपर्यंत साऱ्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साहाचा झालेला संचार झालेला दिसत होता. स्थानिक समुदायाचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात साऱ्यांनी विविध अनुभवांचा आनंद मिळवला.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्‍थितीने उपस्थितांमध्ये अधिक उत्साह संचारला होता. आपल्या अनोख्या शैलीने जॅकी श्रॉफ यांनी लोकांशी संवाद साधला आणि लोकांबरोबर सुमारे 3.5 किलोमीटर  वाटचाल केली. जॅकी श्रॉफ यावेळी लोकांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्हा सर्वांना जीवनात विकसित होण्याची संधी आहे.

जीवनातील आपले ध्येय पूर्ण करण्याचा इरादा कायम बाळगा. निसर्गाने आपल्याला बहाल केलेल्या जमिनीची, मातीची, पाण्याची आणि इतर साऱ्या संसाधनांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी, आपल्या भविष्यासाठी ही भूमी राखणे महत्त्वाचे आहे.’ तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी त्यांनी लोकांना सायकल चालवण्याचा सल्ला याप्रसंगी दिला.

‘नोमोझो’ हा वार्षिक उपक्रम ‘पर्वरी रायझिंग’ या संस्थेने आयोजित केला होता. गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम लोकांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येतून केवळ विश्रांतीच प्रदान करतो असे नाही तर स्थानिकांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधीही देतो.

या उपक्रमामध्ये एफसी गोवा, बाल, युवा, आयटी, वारसा अशा वेगवेगळ्या विभागात पर्यटन, कला, क्रीडा, नृत्य, आरोग्य, पर्यावरण खगोलशास्‍त्र, मार्शल आर्ट, पाळीव प्राणी या संबंधातले स्वारस्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले गेले होते. या जागेत असलेल्या सुमारे १०० स्‍टॉलमधून हस्तकलांच्या खरेदीचा आणि स्वादिष्ट अन्नपदार्थांच्या स्वादाचा आनंद लोकांनी मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT