Winter Travel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Travel: हिवाळ्यात हिल स्टेशन फिरण्याचा प्लॅन करत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्हाला हिवाळ्यात हिल स्टेशनला भेट देण्याची मजा द्विगुणित करायची असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Winter Travel: नवीन वर्षाच्या आगमनासाठी फार कमी दिवस शिल्लक आहेत. नववर्षाच्या निमित्ताने भारताच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाचे वातावरण आहे. नववर्षानिमित्त वाळवंटापासून ते ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरदऱ्यांपर्यंत उत्सवी वातावरण आहे. जानेवारी महिन्यात देशातील अनेक भागात थंडी असते. विशेषतः हिल स्टेशनवर खूप थंडी असते. कडाक्याच्या थंडीतही हजारो लोक दररोज हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करतात. 

  • ठिकाण निवडा

जर तुम्ही हिवाळ्यात एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल तर सर्वात पहिले ठिकाण निश्चित करा. अनेक वेळा हिमाचल, उत्तराखंड किंवा जम्मू-काश्मीरमध्ये इतकी थंडी पडते की माणूस बर्फासारखा गोठतो. कुठे जायचे हे आधीच ठरवले तर गोष्टी खूप सोप्या होतात. ठिकाण निश्चित करून त्या जागेनुसार तुम्ही काही महत्त्वाच्या वस्तू सोबत घेऊन जाऊ शकता. विशेषत: बर्फाळ प्रदेशात जाण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी आधीच तयार कराव्या लागतील.

  • आधीच तिकीट बुक करावी

तुम्ही हिवाळ्यात एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल, तर घर सोडण्यापूर्वी तुम्ही तुमची परतीची तिकिटे आधीच बुक करू शकता. तिकीट बुक केल्याने तुमचा प्रवास खूप सुरक्षित होतो. ज्या दिवशी निघणार आहात त्या दिवशी अनेकांनी बस किंवा ट्रेनची तिकिटे बुक केल्याचे अनेकदा दिसून येते. अशी चूक करू नका. जर तुम्हाला वेळेवर तिकीट मिळाले नाही तर थंड वारे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. विशेषत: तुम्ही कुटुंबासह बाहेर जात असाल तर आधीच तिकीट बुक करा.

  • जॅकेट पॅक करावे

हिवाळ्यात हिल स्टेशनला जाण्यापूर्वी स्वेटर, मफलर, कॅप आणि जॅकेट तसेच ओव्हरकोट जॅकेट पॅक करायला विसरू नका. ओव्हरकोट जॅकेट हिवाळ्यात जीव वाचवणारे आहे. जर तुम्ही हिवाळ्याच्या हंगामात हिमवर्षाव असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ओव्हरकोट जॅकेट पॅक करणे आवश्यक आहे. याशिवाय उबदार इनरवेअर पॅक करायला विसरू नका.

  • थर्मोस्टील घेऊन जाण्यास विसरू नका 

थंडीच्या काळात गरम पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. पर्वतांमध्ये सर्वत्र थंड पाणी उपलब्ध आहे. जे प्रत्येकासाठी पिणे सोपे नाही. म्हणून, जर तुम्ही एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही थर्मोस्टील सोबत नेले पाहिजे. थर्मोस्टीलमध्ये तुम्ही 1-2 लिटर गरम पाणी ठेवू शकता. प्रवासादरम्यान तुम्ही सामान्य पाणी थोडे गरम पाण्यात मिसळून पिऊ शकता. जर मुले एकत्र बाहेर जात असतील तर आपण थर्मोस्टील विसरू नये.

  • प्रथमोपचार पेटी

प्रवासादरम्यान आजारी पडल्यास संपूर्ण प्रवास व्यर्थ ठरतो. तुमची प्रकृती चांगली राहिली तरच तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकता. हिवाळ्यात हिलस्टेशनला जाण्यापूर्वी प्रथमोपचार पेटीत ताप, उलटी, सर्दी यासारख्या आजारांसाठी औषधे पॅक करायला विसरू नका.

या टिप्स देखील लक्षात ठेवा 

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना नेहमी काचेच्या बंद वाहनातून प्रवास करावा. 

  • हिवाळ्यात प्रवास करण्यापूर्वी बूट पॅक करायला विसरू नका.

  • एक किंवा दोन ओव्हरकोट जॅकेट पॅक करावे.

  • हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुम्ही ट्रेकिंग शूज देखील पॅक करू शकता.

  • तसेच प्रवासामध्ये सूपची पाकिटे आणि सुका मेवा ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT