New Year Gift Idea: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Year Gift Idea: 'या' 5 अनोख्या भेटवस्तूंनी तुमची लेडी लव होईल आनंदी

नव वर्षाचा आनंद घेण्यासोबतच वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास गिफ्ट देऊ शकता. यामुळे त्यांचे वर्ष खास बनू शकते. नव वर्षात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराला बजेट फ्रेंडली गिफ्ट देऊन आनंदी करू शकता.

Puja Bonkile

New Year Gift Idea: नव्या वर्षाच्या स्वागताला आता फक्त एकाच दिवसाचा अवधी शिल्लक आहे. नववर्षानिमित्त तुम्ही तुमच्या लव्ह लेडीसोबत आनंदात साजरा करू शकता. त्यांच्यासोबत क्वालिटि टाइम घालवण्यासाठी हा सर्वात खास वेळ आहे. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदाराला नवीन वर्षाचे गिफ्ट देऊन हा क्षण खास बनवू शकता. तुम्हीही तुमच्या जोडीदाराला गिफ्ट देण्याची तयारी करत असाल, तर जाणून घ्या बडेट फ्रेंडली आयडियाज् कोणत्या आहेत.

  • होममेड गिफ्ट

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या लव्ह लेडीचा दिवस नव वर्षात खास बनवू शकता. यासाठी तुम्ही त्यांची आवडती डिश स्वतः तयार करू शकता. त्यांना चॉकलेट, कुकीज आणि त्यांचा आवडता स्नॅक्स गिफ्ट करणंही खास असू शकतं.

  • स्पेशल फोटो फ्रेम

नव वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला डायरी, दोघांचा फोटो असलेला कॉफी मग, उशी, कॅलेंडर किंवा फोटो फ्रेम यासारख्या गोष्टी देऊ शकता. यामुळे तिला स्पेशल वाटेल आणि तिचा नव वर्षातील पहिला दिवस खास बनेल.

  • स्पेशल रिटन स्क्रॅपबुक

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या लव्ह लेडीसाठी खास मॅसेज लिहून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. मार्केटमध्ये उपलब्ध असलेले कार्ड घेणे चांगले मानले जाते. स्क्रॅपबुक देणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. एकमेकांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचे फोटो तुम्ही मेंशन करू शकता.

  • स्पेशल डे आउट

नवीन वर्षानिमित्त जोडीदाराचा नवीन वर्ष खास बनवण्यासाठी खास इव्हेंट किंवा शॉपिंगसाठी घेऊन जाऊ शकता. तुम्ही त्यांच्यासाठी छान ठिकाणी सरप्राईज लंच किंवा डिनर देखील प्लॅन करू शकता. यामुळे त्यांना विशेष वाटेल आणि आनंदही मिळेल.

  • पर्सनल गिफ्ट

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि गरजा या दोन्ही चांगल्याप्रकारे माहीत आहेत. यामुळे तुम्ही त्यांना या खास प्रसंगी खास आणि आवडत्या गोष्टी देऊ शकता. तुम्ही त्यांना स्किन केअर प्रोडक्ट, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट यासारख्या वस्तू भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT