New Shoes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Shoes: नवीन शूज अन् सँडलमुळे पाय दुखत असेल तर करा 'हे' उपाय

नवीन शूज अन् सँडलमुळे पाय दुखत असेल तर तुम्ही पुढील उपाय करू शकता.

Puja Bonkile

New Shoes: शुजच्या दुकानात जाऊन शूज खरेदी करणे इतके सोपे नाही. त्यांची फिटिंग, डिझाईन, रंग, कम्फर्ट सगळं बघावं लागतं. प्रत्येकाला असे फुटवेअर खरेदी करायचे असतात, जे घातल्यानंतर पायांना आराम वाटेल. यामुळेच लोक फुटवेअरवर चांगलाच खर्च करतात.

अनेक वेळा नवीन शूज घातल्यानंतर शूज कापण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जेव्हा शूज त्वचेला घासतो तेव्हा फोड तयार होतात. ज्यामुळे चालताना किंवा धावताना अस्वस्थता येते. जरी कधीकधी शूज बदलणे हा एक पर्याय असतो. परंतु जर तुम्ही असे न करता या दुखण्यावर औषध शोधत असाल तर काळजी करू नका. शूज चावणे टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

  • टाइट शुज गालू नका

शूज खरेदी करताना तुमच्या पायाची बोटे दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे होत असल्यास तुमचे पाय सुजतात. चपला चावणे आणि फोड टाळण्यासाठी, तुम्ही अर्धा किंवा एक आकार मोठा बूट खरेदी करावा.

  • कुशन्‍ड इन्सोल असलेले शुज निवडावे

हार्ड किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या शूजमुळे अनेकदा नवे शूज चावतात. जर तुम्हाला प्रत्येक वेळी ही समस्या येत असेल तर, लेदर किंवा कॅनव्हासचे मऊ आणि श्वास घेण्यायोग्य शूज खरेदी करावा. यामुळे नवे शूज चावण्याची शक्यता कमी होते. अधिक आरामासाठी, फक्त कुशन्‍ड असलेले शूजच खरेदी करावेत.

  • व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा वापर

नवा शूज चावणे टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्या शूजच्या आतील बाजूस मऊ करणे. तुम्ही तुमच्या शूजवर व्हॅसलीन पेट्रोलियम जेली लावून हे करू शकता. पायांना जास्त दुखापत होईल अशा ठिकाणी लावावे.

  • ओलावा कमी करणारे मोजे घालावे

ओलावा दूर करू शकणारे मोजे घालावे. अशा सॉक्समध्ये पाय आणि बूट यांच्यातील घर्षण कमी करण्याची गुणवत्ता असते. ज्यामुळे बूट कापण्याचा धोका कमी होतो. हे मोजे तुमचे पाय कोरडे ठेवण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले असातात. यामुळे फोडांचा धोका कमी होतो.

  • पॅड घालावे

आजकाल शूजच्या आत घालण्यासाठी पॅड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. शूज आरामदायक बनवणारे पॅड तुम्ही निवडू शकता. त्यांच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ किंवा फोड येत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT