Diya Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चुकूनही 'या' पद्धतीने लावू नका दिवा, माता लक्ष्मी होऊ शकते नाराज

पूजा करण्याचा एक खास वेगळा नियम आहे. ज्याचे पालन करून आपण पूजा, पठण, जप आणि ध्यान केले तर आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळते.

Puja Bonkile

दिवा लावण्याचा देखील एक नियम आहे. हा नियम सर्वांनाच माहीत नसतो. त्यामुळे दिवा लावताना अनेकदा चुका होतात आणि या चुकांमुळे दिवा लावल्याचे पूर्ण फळ मिळत नाही. हिंदू धर्मात दीवा लावण्याला खास महत्त्व दिले गेले आहे.

कार्तिक महिना सुरू झाला असून या महिन्यात काही खास ठिकाणी दिवे लावण्याचे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही योग्य नियम आणि पद्धतीने दिवा लावला नाही तर माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.

  • स्वच्छ दिवा

दिवा लावतांना तो स्वच्छ असवा. त्यात जुनी वात पुन्हा वापरू नका. अनेकजण जुन्या दिव्यावर वात लावून दिवा लावतात. असे करणे शुभ मानले जात नाही.

  • हे धातू वापरा

अनेक लोक देवाजवळ दिवा लावण्यासाठी स्टील, प्लॅस्टिक आणि काचेच्या विविध प्रकारच्या धातूंचा वापर करतात. दिवा लावण्यासाठी फक्त पितळ, तांबे, माती सर्वोत्तम आणि पवित्र मानली जाते. त्यामुळे इतर धातूपासून बनवलेले दिवे वापरू नका .

  • पितळीचा दिवा रिकामा ठेऊ नका

पितळीच्या दिव्याला कुबेर दिवा असेही म्हणतात. त्यामुळे या दिव्यात वात, तूप आणि तेल ठेवल्यानंतर त्यात एक-दोन दाणे पिवळे तांदूळ आणि फुलांच्या पाकळ्या टाकून दिवा लावावा.

  • कोणत्या तेलाचा वापर करावा

दिवा लावण्यासाठी तूप, वनस्पती तेल, मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल वापरले जाते . बरेच लोक नकळत सर्व देवी-देवतांच्या समोर सर्व प्रकारचे दिवे लावतात. काही तेलाचे दिवे काही खास दिवस, तिथी आणि देवतांना समर्पित असतात. त्यामुळे नकळत दिवा लावण्यासाठी कोणतेही तेल वापरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT