Navratri Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Special: नवरात्रीत 'या' गोष्टी दिसणे मानले जाते शुभ

नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासुन सुरू झाली असून या दिवसांमध्ये काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते.

Puja Bonkile

Navratri Special: नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासुन सुरू झाला आहे. नवरात्रीचा सण माता दुर्गेला समर्पित आहे. नऊ दिवस माता दुर्गेची मनोभावे पुजा केली जाते. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होऊ शकतात. नवरात्रीत अशा काही गोष्टी आहेत जे पाहिल्यास शुभ मानले जाते. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

घरासमोर गाय पाहणे

नवरात्रीच्या दिवसांमध्ये घराच्या दारात गाय दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की माता दुर्गा तुमच्या पूजेने खूप खुश आहे आणि तुमची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. यासोबतच तुम्हाला सन्मानही मिळणार आहे. 

नवरात्रीत मातेला अर्पण केलेली फुले गळणे

माता दुर्गा यांना अर्पण केलेली फुले नवरात्रीच्या काळात पूजेच्या वेळी तुमच्या अंगावर पडणे हे अतिशय शुभ लक्षण मानले जाते. यामुळे तुमच्यावर लवकरच माता दुर्गेचा आशीर्वाद होऊ शकतो. तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते. 

नवरात्रीत घुबड पाहणे

नवरात्रीमध्ये घुबड दिसल्यास ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न असून लवकरच तुमच्या घरी सुखाचे आगमन होणार आहे, असे म्हटले जाते. तसेच, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. 

घरात मुलीचे आगमन

नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरी मुलीचे आगमन झाले तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की माता दुर्गा तुमच्या घरी आली आहे आणि तुमचे दु:ख दूर होणार आहे. 

जास्वंदाचे फूल

जर तुम्हाला मंदिरात जास्वंदाचे फूल दिसले तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या आता संपणार आहेत आणि तुम्हाला माता दुर्गेचा आशीर्वाद मिळेल. 

शंखचा आवाज ऐकणे

नवरात्रीच्या काळात पूजेच्या वेळी शंख फुंकताना मोठ्याने आवाज आला तर याचा अर्थ असा की माता दुर्गा तुमच्या घरी येणार आहे. यासोबतच सुख-समृद्धीही घरात लाभणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT