Swapna Shastra: स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. भविष्यातील घडामोडीही या स्वप्नांतून ओळखता येतात. काही स्वप्ने चांगल्या दिवसांची माहिती देतात तर काही भविष्यातील संकटांची माहिती देतात.
स्वप्नात देवी-देवता दिसण्याचा देखील खास अर्थ असतो. नवरात्रीमध्ये माता दुर्गाला स्वप्नात पाहण्याचा विशेष अर्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया.
माता दुर्गा स्वप्नात दिसल्यास काय अर्थ
भाग्य उजळेल
स्वप्नात दुर्गा मातेचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. खास करून नवरात्रीच्या वेळी जर तुम्हाला हे स्वप्न पडले असेल तर याचा अर्थ असा आहे की देवी माता तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि लवकरच तुमचे भाग्य तिच्या कृपेने उजळणार आहे.
लाल कपड्यांमध्ये मातेचे दर्शन
स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात देवी माता लाल कपड्यांमध्ये हसताना दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात लवकरच काही चांगले बदल होणार आहेत. हा बदल जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतो.
मातेचे मंदिर
स्वप्नात माता दुर्गेचे मंदिर पाहणे आणि तेथे पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे स्वप्न दिसणे म्हणजे लवकरच तुमच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात.
माता दुर्गेची मुर्ती
स्वप्नात माता दुर्गेची मूर्ती पाहणे खूप आनंददायी मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. हे स्वप्न सांगते की तुम्ही मानसिक समस्यांपासून मुक्त होणार आहात.
माता दुर्गा सिंहार स्वार
नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर माता दुर्गा सिंहावर स्वार झालेली दिसली किंवा सिंह गर्जना करत आहे असे स्वप्न दिसणे म्हणजे भविष्यात काही समस्या दर्शवते. हे स्वप्न सांगते की तुम्ही लवकरच एखाद्या मोठ्या संकटात सापडू शकता. असे स्वप्न पडल्यावर दुर्गादेवीची पूजा करून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा.
विवाहा सबंधित समस्या
नवरात्रीत माता दुर्गेचे स्वप्न पाहणे शुभ असते. जर तुम्ही अविवाहित असाल तर असे स्वप्न दिसणे म्हणजे तुमचे लग्न लवकरच निश्चित होईल. विवाहितांना मुलांचे सुख मिळू शकते. हे स्वप्न देखील नवीन रोजगार मिळण्याचे संकेत आहे. मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात लवकरच सकारात्मकता येईल.
मानसिक समस्या दूर
स्वप्नात माता दुर्गेची मूर्ती पाहणे खूप आनंददायी आणि शुभ मानले जाते. असे स्वप्न दिसणे म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. हे स्वप्न सांगते की तुम्ही मानसिक समस्यांपासून मुक्त होणार आहात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.