Navratri Special 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri 2023: नवरात्रीत सात्विक आहार घेणे मानले जाते आरोग्यदायी

देशभरात आजपासून नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. या नऊ दिवसात माता दुर्गेची मनोभावे पुजा केली जाते.

Puja Bonkile

Navratri 2023: आजपासून देशभरात नऊ दिवस नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या नऊ दिवसात माता दुर्गेची मनोभावे पुजा केली जाते. अनेक लोक या दिवसांमध्ये उपवास करतात. तर अनेक लोक फक्त सातिव्क आहार घेतात.

या नऊ दिवसांमध्ये काही लोक कांदा, लसूण, कंदमूळ भाज्या, चहा, कॉफीचे सेवन टाळतात. नवरात्रीत फक्त फळाहार केला जातो.यामध्ये फळ, राजगिरा, भगर यासारख्या पदार्थांचे सेवन केले जाते. हे खाद्यपदार्थ सात्विक तर आहेतच शिवाय ते आरोग्यदायीही आहेत. फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे, सात्विक आहार विषारी पदार्थ बाहेर टाकू शकतो.

नवरात्रीत सात्विक आहार का घेतात?

शरीर डिटॉक्स

सात्विक पदार्थ हे साधारणपणे हलके, पचायला सुलभ असतात. यामध्ये जास्त मसाले आणि फॅट्स नसतात. हे शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि पाचन तंत्राला आराम करण्यास मदत करू शकते.

दिवसभर एनर्जेटिक ठेवते

सात्विक पदार्थ हे नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले असतात. अशा पदार्थांचे सेवन केल्याने दिवसभर शाश्वत ऊर्जा मिळते आणि संपूर्ण चैतन्य टिकवून ठेवण्यास मदत होते.

मन शांत ठेवते

सात्विक आहाराच्या साधेपणामुळे मानसिक स्पष्टता वाढते आणि मानसिक अस्वस्थता कमी होते असे मानले जाते. यामुळे ध्यान आणि प्रार्थना करताना मदत करते.

पचनक्रिया सुरळित राहते

पचनसंस्था सुरळित करण्यासाठी सात्विक आहार घेणे गरजेचे असते. तुम्हाला जर पोटासंबंधित आजार असेल तर तुम्ही सात्विक आहार घेणे सुरू केले पाहिजे. यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात.

शांत स्वभाव

सात्विक अन्नाचा मनावर शांत प्रभाव पडतो असे मानले जाते. जे लोक सात्विक आहार घेतात ते रागीत स्वभावाचे नसतात. ते कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करतात.

संतुलित आहार

सात्विक आहारामध्ये अनेकदा विविध फळे, भाज्या, सुकामेवा, आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो. हे उपवासाच्या काळात संतुलित पोषण आहार राखण्यास मदत करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT