Low carb diet to manage diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

National Nutrition Week: Diabetes साठी आहारात 'कार्बोहायड्रेट्स' आवश्यकच

आहारातील कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे काढून टाकणे हे चुकीचे आहे, या उलट आपण असा आहार घेतला पाहिजे जो शरीराला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट देतो.

दैनिक गोमन्तक

मधुमेह (diabetes) हा एक गुंतागुंतीचा आजार (disease) आहे, एकदा जर का तुम्हाला मधुमेह झाला तर तो कायम तुमच्या सोबतच राहतो. मधुमेह झाल्यावर तुम्हाला सगळ्या बाजूने काळजी घेण आवश्यक आहे नाहीतर हा रोग तुमचे शरीर पोखरून काढतो. शरीरातील साखरेच प्रमाण (range of blood sugar levels) संतुलित न राहिल्यास तुमच्या आरोग्याला (health) धोका निर्माण होऊ शकतो. शरीरात मधुमेह बळावल्यास तो तुमच्या शरीरातील एक एक अवयव निकामी होत जातो. आणि हे जर का टाळायच असेल तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देऊन मधुमेह आटोक्यात कसं राहील या कडे लक्ष दिले पाहिजे.

रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवल्यास शरीरावर होणार परिणाम आटोक्यात येतो. निरोगी मधुमेह पातळीच्या व्यवस्थापनामध्ये आहार, व्यायाम, पाण्याचे सेवन, झोप, स्वच्छता, तणाव पातळी आणि एकूणच जीवनशैली या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. हा सप्ताह राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून ओळखला जातो, या निमित्ताने मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आहार व्यवस्थापनाबद्दल बोलूया. “बहुतेकदा, कार्बोहायड्रेट्स अशा पदार्थांमध्ये असतात जे पदार्थ आपण मधुमेहाच्या कारणाने सतत टाळत असतो.

Low carb diet to manage diabetes

आपण कार्बोहायड्रेट्सला शत्रू मानण्यास सुरुवात करतो, ज्याची काहीच गरज नसते कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात ज्यामुळे प्रथिने आणि चरबी कमी होती. जी नंतर त्यांच्या संबंधित जैविक कार्यांसाठी वापरली जातात. कार्बोहायड्रेट्स रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करतात आणि हे सेल्युलर चयापचयची प्राथमिक गरज असतात. आहारातील हे सूक्ष्म पोषक आपल्या दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक असलेले आहारातील तंतू पुरवतात. ते निरोगी संतुलित आहाराचा अविभाज्य भाग आहेत. आणि नेमक हेच महत्वाचे घटक आपण टाळायला सुरवात करतो.

Low carb diet to manage diabetes

आहाराचे योग्य संतुलन राखण्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेटचे प्रकार आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर त्यांचे होणारे परिणाम माहित असणे आवश्यक आहे, ”GOQii स्मार्ट हेल्थकेअरच्या जीवनशैली तज्ञ गीतिका पाटनी यांच्या म्हणण्या प्रमाणे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्याचे ध्येय असते तेव्हा कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे काढून टाकण्याचे सांगितले जात नाही; त्याऐवजी आपण असा आहार घेऊ शकतो जे जटिल कार्बोहायड्रेटचे योग्य प्रमाण देते. स्टार्च आणि तंतू हे जटिल कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत. यामध्ये संपूर्ण धान्य, बीन्स, फळे आणि भाज्या समाविष्ट असतात.

साध्या कार्बोहायड्रेटचे सेवन कसे कमी करावे?

  • ब्रेड, पास्ता, कॉर्नफ्लेक्स आणि नाश्त्याच्या धान्यांसह सर्व पॅकेज केलेले अन्न टाळा-घटक लेबल काळजीपूर्वक वाचा आणि फायबर सर्व्हिंग असलेले उत्पादन निवडा जे 5 ग्रॅम पेक्षा कमी असेल

  • गोड साखरयुक्त पेये - सोडा, फ्लेवर्ड कॉफी इत्यादी टाळा;

  • गोड केलेले दही, कृत्रिमरित्या चवीचे सॉस टाळा

  • चॉकलेट, कुकीज, बेकरी उत्पादने टाळा

  • फ्रेंच फ्राई आणि पॅकेज केलेले स्नॅक्स टाळा

  • कृत्रिम गोड पदार्थ टाळा.

आपल्या मधुमेहाच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्ब्सचा समावेश कसा करावा?

  • परिष्कृत गव्हाच्या पिठाच्या रोट्यांच्या जागी मल्टीग्रेन किंवा ओट्सच्या रोट्या वापरा.

  • पांढरे तांदूळाच्या ऐवजी ब्राऊन राईस वापरा.

  • जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही ब्राऊन राइसचा दलिया करू शकता.

  • दिवसातून किमान 1 फळांचे सेवन करा - शक्यतो सफरचंद, पपई, पेरू, नाशपाती, चेरी किंवा बेरी

  • प्रत्येक जेवणात विविध प्रकारे भाज्या घाला- किसलेले गाजर रोटी भरण्याचा प्रयत्न करा

  • बटाट्याच्या जागी रताळे घाला.

  • दिवसातून कमीतकमी 1 जेवणात सॅलड समाविष्ट करा-शक्यतो एक संपूर्ण गाजर आणि एक संपूर्ण काकडी.

  • सॅलडमध्ये उकडलेले बीन्स, स्प्राउट्स, उकडलेले डाळी, नट किंवा मिश्रित बिया घाला.

  • शेवटी, भाज्यांच्या सूपमध्ये बार्ली, बीन्स किंवा रताळे घाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT