Doctor’s Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Doctor’s Day 2022: 'जागतिक डॉक्टर्स दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व

National Doctor’s day 2022: इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' म्हणुन साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

आपले आरोग्य निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात. कोरोना काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनी पाहिले. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवतो याची खात्री करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो. (National Doctor’s day 2022 News)

बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1991 रोजी भारतात प्रथमच 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. त्यांनी 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. डॉ. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने म्हणजेच 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. योगायोगाने त्यांचेही 1 जुलै (1962) रोजी निधन झाले. या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली म्हणून काही लोक राष्ट्रीय डॉक्टर दिनही साजरा करतात. डॉ बी सी रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

'डॉक्टर्स डे' (Doctor's Day) वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करण्याची पद्धत थोडी फार सारखीच आहे. या दिवशी डॉक्टरांना ग्रीटिंग कार्ड देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी, डॉक्टर त्यांच्या रूग्ण आणि त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत एखाद्या विशिष्ट आजाराच्या विषयावर सेमिनार आयोजित करतात.

कोरोनानंतर (Corona) डॉक्टरांचे महत्त्व शब्दात मांडता येणार नाही. मरणासन्न रुग्णाला नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. कोरोना काळात डॉक्टर आणि त्यांचे सहकारी 10 ते 15 दिवस सतत रूग्णालयात राहून जीव धोक्यात घालून रूग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जीवाची पर्वा न करता, जगातील डॉक्टरांनी ज्या भावनेने आणि समर्पणाने रुग्णांची सेवा केली त्याला सलाम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT