Nail Growth Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nail Growth Tips: लांब अन् सुंदर नखांसाठी 'या' घरगुती गोष्टींची घ्यावी मदत, भासणार नाही नेल आर्टची गरज

नखे सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय केल्यास तुम्हाला नेल आर्ट करण्याची गरज भासणार नाही.

Puja Bonkile

nail care tips follow these home remedies for long and beautiful nails

आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच महिला आपल्या नखांच्या सौंदर्याची देखील खूप काळजी घेतात. लांब आणि सुंदर नखे हातांचे सौंदर्य वाढवतात. नखांना आकार देण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी खूप काळजी घेतात. कधीकधी नखे तुटतात आणि वाढू शकत नाहीत. अशावेळी घरगुती उपायांनी नखे सुंदर आणि मजबूत बनवू शकता.

नखे वाढवण्यासाठी काय करावे

लिंबाचा वापर

लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपुर असते. जे नखांच्या वाढीसाठी चांगले आहे. हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून नखांचे संरक्षण करते. लिंबाचा रस नखांवर लावल्याने किंवा कापलेले लिंबू नखांवर चोळल्याने फायदा होतो.

दुधाचा वापर

नखांच्या वाढ चांगली होण्यासाठी दुधाचा वापर करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपुर प्रमाणात असते. नखांना हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग करण्यासाठी हे फायदेशीर आहे. यासाठी एका भांड्यात दोन चमचे दूध घ्या आणि त्यात अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. त्याचे मिश्रण तयार करा आणि त्यात तुमचे नखे सुमारे 20 मिनिटे बुडवा आणि कोमट पाण्याने हात धुवा.

खोबरेल तेल

नारळाचे तेल त्वचा, केस तसेच नखांसाठी फायदेशीर आहे. वाढत्या नखांसह, संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. नारळाच्या तेलाने नखांची मसाज करावी. रात्री झोपण्यापूर्वी नखांना खोबरेल तेल लावावे.

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस नखांच्या वाढीसाठी एक प्रभावी उपाय आहे. वाढत्या नखांसह, ते नाजूक आणि कमकुवत नखे देखील मजबूत करते. त्यात व्हिटॅमिन सी असते. यासाठी 20 मिनिटे संत्र्याचा रस नखांवर लावू ठेवावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT