Nail Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nail Care: नेल एक्सटेंशन केल्यानंतर 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात

नखांवर एक्सटेंशन केल्यावर त्याचे सौंदर्य वाढते पण ते केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Nail Care: तुम्‍ही नेल एक्‍स्‍टेंशन करण्‍याचा विचार करत आहात का? नेल एक्स्टेंशन केल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. अनेक वेळा सौंदर्यामुळे अनेक लोक नखे वाढवतात आणि नंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही नेल एक्स्टेंशन करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

  • नखांना इजा होऊ देऊ नका

नेल एक्सटेंशन केल्यानंतर नखांना इजा होऊ देऊ नका. जर तुम्ही घरातील कामे किंवा भांडी घासत असाल तर नखे वाढवू नका. कारण दुखापत झाल्यास इजा होऊ शकते.

  • सारखे एक्सटेंशन करू नका

जर तुम्ही नेल एक्स्टेंशन पुन्हा पुन्हा केले तर ते तुमच्या स्वतःच्या नखांना खराब करू शकता. एक्सटेंशम केल्यानंतर काही दिवसांना परत तसेच लगेच करू नका. काही दिवसांचा वेळ गेल्यानंतर एक्सटेंशन करावे.

साइजकडे लक्ष द्या

बहुतेक लोक त्यांच्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखे वाढवतात, तर बरेच लोक त्यांच्या नखांचा आकार वाढवण्यासाठी ते करतात. नेल एक्स्टेंशन तुमच्या हातावर जास्तीत जास्त 1 महिना टिकतात. नेल एक्स्टेंशन करत असताना, अनेक वेळा नखांचा आकार खूप मोठा होतो. जर तुम्ही घरगुती काम करत असाल किंवा नोकरी करत असाल तर तुम्ही तुमचे नेल एक्स्टेंशन कधीही जास्त लांब करू नये. यामुळे तुमचे हात सुंदर दिसू शकतात पण त्यामुळे काम करताना खूप अडचणी येतात.

  • क्यूटिकल ऑइल लावा

नेल एक्स्टेंशन केल्यानंतर नखांना रोज क्यूटिकल तेल लावावे. यामुळे तुमची नखं कोरडी होत नाहीत. तुम्ही वेळोवेळी क्युटिकल ऑइल लावल्यास तुमच्या नख ड्राय पडणार नाही.

  • लाइट रंग लावावा

अनेक लोक डार्क कलर लावतात. तुमच्या स्किन कलरनुसार रंग निवडावे.यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर नखे सुंदर दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT