Nag Panchami 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nag Panchami 2022: नागपंचमीचा मुहूर्त, महत्व आणि पूजेची योग्य पद्धत जाणून घ्या

Nag Panchami 2022: नागाबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मात श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांना विशेष महत्त्व आहे. याच महिन्यात नागपंचमीचा सणही साजरा केला जातो. नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. (Nag Panchami 2022)

नागाबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या सणानिमित्त घरोघरो नाग देवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या 12 रुपांची पूजा केली जाते.

नागपंचमी दिवशी नागदेवता आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा करण्याचे महत्त्व आहे. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, या दिवशी सर्प देवता आणि भगवान शिव यांची विधिनुसार पूजा केल्यास इच्छित फळ मिळते. नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व, पूजेची पद्धत जाणून घेऊया.

शुभ वेळ

हिंदू कॅलेंडरनुसार, पंचमीची तिथी 2 ऑगस्ट रोजी पहाटे 05 वाजून 14 मिनिटांपासून सुरू होईल, जो 3 ऑगस्ट रोजी पहाटे 05 वाजून 42 मिनिटांपर्यंत राहील. मुहूर्ताचा कालावधी 02 तास 41 मिनिटे असेल. 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 5 वाजून 42 मिनिटांपासून ते 8 वाजून 24 मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त असेल. नागपंचमीचा शुभ मुहूर्त 02 तास 41 मिनिटे इतका आहे.

नागपंचमीचे महत्त्व

हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, नागपंचमीच्या दिवशी नियमानुसार नागदेवतेची पूजा केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. याशिवाय व्यक्तीला काल सर्प दोषापासूनही मुक्ती मिळते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग आहे, त्यामुळे या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात.

पूजा कशी करावी

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागदेवतेची मूर्ती ठेवावी. यासोबतच शिव आणि माता पार्वतीची मूर्ती आणि श्रृंगाराचे साहित्य ठेवावे. देवतांना अर्पण करण्यासाठी बेलाची पाने, धतुरा, भांग आणि बेलाची फळ ठेवा. गाईच्या कच्च्या दुधाने सर्व देवतांना जलाभिषेक करा. पंचमेव फळ देवतांना अर्पण करा. यासोबत या मंत्राचा जप करा - 'ऊं भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि, तन्नो नाग: प्रचोदयात्।

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT