Music therapy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Music Therapy: संगीतोपचाराचे 'हे' आहेत स्वास्थ्यवर्धक लाभ, वाचा सविस्तर...

कुठल्याही आजारी व्यक्तीसाठी 50 गोळ्या एकीकडे आणि एक चांगलं गाणं एकीकडे. संगीत हे मानवी जीवनामध्ये व्यक्त होण्यासाठीचे सरळ साधे सोपे आणि कायम सहजपणे उपलब्ध असलेले outlet आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

संगीत आणि मनुष्याचा एक वेगळाच chord देवाने तयार केलेला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, कुठल्याही वेळेपर्यंत, कशाही मूडमध्ये असलो तरीही परमेश्वर आपल्यासोबत संगीतातून बोलत असतो. आपली मदत करत असतो आणि खरं म्हणजे कित्येक वेळा आपल्याला सावरत असतो. कुठल्याही आजारी व्यक्तीसाठी 50 गोळ्या एकीकडे आणि एक चांगलं गाणं एकीकडे. संगीत हे मानवी जीवनामध्ये व्यक्त होण्यासाठीचे सरळ साधे सोपे आणि कायम सहजपणे उपलब्ध असलेले outlet आहे.

म्हणजे काय तर संगीत किंवा अगदीच एक चांगलं गाणं तुमच्या आयुष्यामध्ये आवश्यक असणारे सर्व बदल नक्की करू शकतं. एवढी ताकद देवाने संगीतालाआशीर्वाद म्हणून दिलेली आहे. शास्त्रीय संगीतातील कुठलाही राग हा Therapeutic Agent म्हणून काम करतो. रागातील कोमल स्वर मेंदूला शिथिल करतात आणि झोप देतात तर शुद्ध स्वर ऊर्जा किंवा जागरूकता देतात. एवढेच काय संगीतातले ध्वनी हे कप, पित्त आणि वात अशा विकारांवर उपचार ठरू शकतात याचे अनेक उल्लेख प्राचीन ग्रंथात आहेत.

असे काही काही राग आहेत ज्यांचा उपयोग संगीतोपचार पद्धतीत महत्वाचा मानला गेला आहे. तसेच ते राग ऐकण्याच्या वेळाही ठरविण्यात आलेल्या असतात त्यानुसार एखाद्या विशिष्ट राग ऐकून या दोषांवर परिणाम साधता येतो cardiac disease साठी राग पुरीया आणि हिंडोल हे राग उपयुक्त आहेत, Insomnia म्हणजेच निद्रानाशाच्या विकारात बागेश्री राग भैरवी.

मानसिक तणावात राग 'अहिर भैरव' आणि 'पुरिया' उपयुक्त ठरतो तसेच संताप आणि चिडचिड कमी करण्यासाठी राग 'मधुवंती, मधुकंस, मारूबिहाग हे उपयुक्त ठरतात. Gastrointestinal disease मध्ये राग 'भैरवी आणि पिलु' हे उपयुक्त ठरतात. डोके जड होणे आम्लपित्त, उष्णता यावर 'काफी, मारवा, कलावती, खमाज' ऐकल्यास फरक पडतो. वाद्यसंगीत ऐकल्याने स्मरणशक्तीचा विकास होतो. तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी शांतरस असणारे वाद्य संगीत ऐका. ज्यांचा रक्तदाब सतत कमी होतो त्यांनी 'सारंगी किंवा गिटार' अशी तंतुवाद्य ऐकायला हवीत. कुठलाही तंतुवाद्य वाजवणारा कलाकार सादरीकरण करताना शेवटच्या टप्प्यात 'द्रुत लय' म्हणजेच जलद गतीने वाजवतो त्याचा उपयोग हृदयाचे ठोके जलद गतीने आणि योग्य ठिकाणी पडायला होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Social Media Ban: "आता बस्स झालं!" गोव्यात लवकरच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? मंत्री खंवटे घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

Chandranath Hill Goa History: हिमालयापेक्षाही प्राचीन; गोव्यातील 'चंद्रनाथ पर्वता'चा विस्मयकारक इतिहास आणि चंद्रेश्वराचा वारसा!

Viral Video: अंधश्रद्धेचा आधार अन् फिल्मी ड्रामा; बेडवर सापाची कात सोडून गायब झालेल्या 'त्या' तरुणीचा इन्स्टावर खुलासा, म्हणाली, "नागीण बनली..."

Dabolim Airport: "दाबोळी विमानतळ बंद होणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावून सांगत विरोधकांची केली बोलती बंद

AUS vs ZIM: क्रिकेटचा नवा 'जायंट किलर'! झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवले; विश्वचषकात मोठा उलटफेर VIDEO

SCROLL FOR NEXT