Mushrooms Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मशरूम खा अन् आजारांपासून रहा दूर

Mushrooms Health Benefits: मशरूम केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील अनेक भागात मशरूमचे विविध प्रकार आढळतात. बाजारात मशरूम (Mushrooms) सहज उपलब्ध होतात. ही एक अशी भाजी आहे, जी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मशरूम चवीला देखील स्वादिष्ट असतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूम केवळ चवीलाच अप्रतिम नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळतात. यामुळेच मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते. मशरूम खाणे आरोग्यदायी मानले जाते. (Mushrooms Health Benefits News)

* हृदय निरोगी राहते

मशरूमच्या सेवनाने हृदयाचे (Heart) आरोग्य निरोगी राहते. मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हृदयविकाराचे प्रमाणात कमी होतो.

* मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनची पातळी नियत्रंणात राहते.

* पोटाच्या समस्यांपासून मुक्ती

मशरूमच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या दूर होतात. फॉलिक अॅसिडमुळे ते शरीरात रक्त बनवण्याचेही काम करते.

* हाडाचे आरोग्य राहते निरोगी

मशरूमच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. त्यात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन डीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

* अँटी-एजिंग

मशरूम त्वचेसाठीही (Skin) खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT