Mouth Cancer Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mouth Cancer Symptoms: तोंडाच्या कर्करोगाची 'ही' 6 लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

कोणताही आजार सुरू होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. या लक्षणांना किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करु नका.

दैनिक गोमन्तक

Mouth Cancer Symptoms: गेल्या काही दशकांमध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. धावपळीच्या काळात लोकांकडून होणारे दुर्लक्ष यात भर घालत आहे.

अति धूम्रपान आणि अल्कोहोलच्या नशेमुळे होणाऱ्या आजारांमध्ये धोकादायक ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) चाही समावेश करण्यात आला आहे. तोंडाचा कर्करोग हा कर्करोगाच्या सर्वात धोकादायक प्रकारांपैकी एक आहे. 

कारण त्याचा माणसाच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. एखाद्याची बोलण्याची पद्धत बदलू शकते. खाणे-पिणे यासारखी अत्यावश्यक कामे कठीण करू शकतात. एवढेच नाही तर हा कर्करोग व्यक्तीचे शारीरिक स्वरूप देखील बदलू शकतो. 

कोणताही आजार सुरू होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. अनेक वेळा या लक्षणांना किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. या चुकीमुळे कर्करोगाला शरीरात पाय पसरण्याची संधी मिळते. 

कोणत्याही आजाराच्या लक्षणांबाबत लोकांमध्ये जागरुकता असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरात होणार्‍या छोट्या-छोट्या बदलांवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण कोणताही रोग शरीरात एकाच वेळी उद्भवत नाही, तर तो शरीरात काही लक्षणे प्रकट करतो, ज्यामुळे हे रोग वेळेवर ओळखले जाऊ शकतात आणि वेळेवर उपचार केले जाऊ शकतात.

  • शरीरातील बदलांकडे द्यावे खास लक्ष

कोणताही रोग पकडण्याचा पहिला मार्ग म्हणजे तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात होणारे बदल जाणवणे. जर तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक वेदना होत असतील तर उशीर न करता डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. 

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, गालाच्या आतील बाजूस, जीभेवर, तोंडाचा वरचा भाग, हिरड्या किंवा ओठांवर ढेकूळ किंवा गाठ तयार होते तेव्हा तोंडाचा कर्करोग होतो. तोंडाचा कर्करोग कसा ओळखता येईल ते जाणून घेऊया.

  • तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे

1. तोंडात वेदनादायक अल्सर दीर्घकाळ टिकून राहणे, जे लवकर बरे होत नाही.
2. मानेमध्ये किंवा तोंडात गाठ तयार होणे
3. दात हालतात
4. जीभ किंवा ओठ सुन्न पडणे
5. जिभेला किंवा तोंडावर लाल किंवा पांढरे चट्टे
6. बोलण्यात बदल जसे की अचानक तोतरे बोलणे

तुम्हाला वर सांगितलेल्या कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्ही दररोज धूम्रपान करत असाल किंवा मद्यपान करत असाल आणि शरीरात अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाण्यास एक मिनिटही उशीर करू नये. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT