Mother's Day Special: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mother's Day Special: आईच्या पर्समध्ये ठेवा 'ही' 6 औषधे, कधीही पडू शकते गरज

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदाचा मदर्स डे हा १४ मे रोजी साजरा केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Mother's Day Special: प्रत्येकाच्या आयुष्यात आईची भूमिका खूप खास असते. या जगात आणण्यापासून ते जगाला सक्षम बनवण्यापर्यंत आई आपल्या मुलासोबत असते. पण तरीही तिला कौतुकाचा वाटा मिळत नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदाचा मदर्स डे हा 14 मे रोजी सर्वत्र साजरा केला जात आहे.

महिलांच्या आरोग्याची काळजी करणे खुप गरजेचे असते. जे वृद्धत्वात अधिक नाजूक होते. वृद्धावस्थेत महिलांनी नेहमी काही औषधे सोबत ठेवले पाहिजे. ज्याची कधीही गरज भासू शकते. या मदर्स डे, ही औषधे तुमच्या आईच्या पर्समध्ये नक्कीच ठेवा.

  • पेन किलर

जेव्हा स्नायू, ऊती आणि नसा कमकुवत होतात तेव्हा वेदना होतात. FDA (संदर्भ) सांगते की पुरुषांपेक्षा स्त्रियांना समस्या होण्याची शक्यता जास्त असते. ज्यामध्ये मायग्रेनचे दुखणे, पाठदुखी इत्यादी दीर्घकाळ टिकू शकतात. म्हणूनच त्यांनी नेहमी पेन किलर औषध सोबत ठेवल्या पाहिजे.

  • मल्टी व्हिटॅमिन

व्हिटॅमिन डी , लोह, फोलेट, कॅल्शियम इत्यादी पोषक तत्वांची कमतरता स्त्रियांमध्ये अधिक जाणवते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, अॅनिमिया इत्यादी गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच आईला वृद्धापकाळात मल्टी व्हिटॅमिन्स पर्समध्ये ठेवण्याचा सल्ला द्यावा.

Medicine
  • अँटासिड्स

अँटासिड्स अशी औषधे आहेत, जी ऍसिडिटी आणि गॅससारख्या समस्यांपासून बचाव करतात. प्रत्येक स्त्रीने ही औषधे सोबत ठेवावीत. कारण, वृद्धत्व आणि तणावामुळे पचन खराब होऊ शकते आणि पोट फुगणे, अपचन, छातीत जळजळ होऊ शकते.

  • थायरॉईडची औषध

पुरुषांपेक्षा स्त्रियांना थायरॉईड रोगाचा धोका जास्त असतो आणि वाढत्या वयानुसार त्याचा धोका वाढतो. या आजारात शारीरिक दुखण्यापासून वजन वाढणे किंवा कमी होण्यापर्यंतची समस्या असते. त्यामुळे जर तुमच्या आईला हा आजार असेल तर थायरॉईडचे औषध नक्कीच सोबत ठेवा.

  • हाय बीपी आणि शुगरची औषध

हाय बीपी आणि शुगर हे असे आजार आहेत, ज्यांचे औषध रोज नियमित घ्यावे लागते. या औषधांचा एकही डोस चुकला तर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जर एखाद्या महिलेला उच्च रक्तदाब किंवा साखरेचा आजार असेल तर ही औषधे नेहमी तिच्या पर्समध्ये असावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT