mosquito coils
mosquito coils  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mosquito Coil Side Effects: सिगारेटपेक्षा मॉस्किटो कॉइलचा धुर आरोग्यासाठी धोकादायक

दैनिक गोमन्तक

Mosquito Coil Side Effects: उन्हाळामध्ये डासांचे प्रमाण अधिक वाढते. आपण लाखो खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवू शकतो, परंतु तरीही डास घरात घुसतात आणि नंतर चावतात आणि मानवी जीवन कठीण करतात. 

काही लोक ते टाळण्यासाठी कीटकनाशके वापरतात, तर काही लोक कॉइल जाळून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करतात. पण मॉस्किटो कॉइलमुळे अनेक आजार उद्भउ शकतात.

बरेच लोक घरामध्ये कॉइल जळत ठेवतात. कॉइल जळल्यावर निघणारा धूर खोलीतील प्रदूषण पातळी वाढवू शकतो आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा COPD होऊ शकतो. 

एका अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीने कॉइलमधून धूरचा श्वास घेतला तर तो 100 सिगारेट ओढण्याइतका असू शकतो. इतकंच नाही तर पूजेत वापरल्या जाणाऱ्या अगरबत्तीचा धूर 50 सिगारेट ओढण्याइतका आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या काही आकडेवारीनुसार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा सीओपीडी, जो फुफ्फुसाचा दाहक रोग आहे, यामुळे मुंबईत दररोज किमान 6 लोक आपला जीव गमावतात. 

ही स्थिती केवळ मुंबईचीच नाही, तर भारतातील अनेक भागांत या आजाराने अनेकांना ग्रासले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा अंदाज आहे की सन 2019 मध्ये भारतात 1,00,000 लोकसंख्येमागे 98 टक्के लोकांनी COPD मुळे आपला जीव गमावला आहे.

  • कॉइल कसे कार्य करतात?

जुन्या कॉइल आणि काड्या पूर्वी पायरेथ्रम पेस्टपासून तयार केल्या जात होत्या. पायरेथ्रॉइड कीटकनाशके आजच्या मच्छर कॉइलमध्ये टाकली जातात किंवा ती सिट्रोनेलासारख्या वनस्पतींपासून तयार केली जातात. 

सिडनी युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, कीटकनाशक असलेली मॉस्किटो कॉइल जाळल्याने मलेरियासारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो किंवा डासांपासून स्वतःचा बचाव होऊ शकतो याचा कोणताही पुरावा नाही. 

  • डासांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

1. पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि लांब पँट घालावे.
2. मच्छरदाणी लावून झोपावे. 
3. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी साचलेले पाणी त्वरित फेकुन टाका.
4. तुमच्या घराभोवती स्वच्छता ठेवा.
5. संध्याकाळी दारे आणि खिडक्या बंद ठेवा.
6. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी वेळोवेळी फॉगिंग करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT