Morning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Tips: तुम्हालाही वारंवार जांभई येते का? असू शकते गंभीर आजारांचे लक्षण

तुम्ही कधी विचार केला आहे का की जांभई कशामुळे येते? चला तर मग जाणून घेऊया.

Puja Bonkile

morning tips yawning sign of these diseases read list

अनेक लोकांना सकाळी उठल्यावर जांभई येते. ही एक सामान्य गोष्ट आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जांभई का येते? झोप न लागणे, जास्त झोप लागणे आणि थकवा यांमुळे जांभई येते. खरं तर, एखादी व्यक्ती दिवसातून 5 ते 18 वेळा जांभई देऊ शकते आणि ही देखील एक सामान्य गोष्ट आहे.

जेव्हा आपल्या शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज असते किंवा जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा आपले शरीर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन शोषण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे आपण जांभई देतो.

सारखी जांभई येणे सामान्य नाही

दिवसभर एक सारखी जांभई चांगले लक्षण नाही. जास्त जांभई येणे हे देखील काही आजाराचे लक्षण असू शकते. जांभई जास्त येणे हे आपल्या शरीरात काही गंभीर आजार विकसित होण्याचे लक्षण असू शकते. जांभई दिल्याने कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया.

झोपताना श्वास बंद होणे

या प्रकारचा आजारामध्ये आहे रात्री झोपताना श्वासोच्छ्वास अनेक वेळा थांबतो, त्यामुळे झोपेचा त्रास होतो आणि दिवसभर जांभई येत राहते.

मधुमेह

मधुमेह असणाऱ्या लोकांना सारखी जांभई येणे देखील सामान्य आहे. शरीरात ग्लुकोजच्या कमतरतेमुळे हायपोग्लायसेमियामुळे जांभई येते.

नार्कोलेप्सी

नार्कोलेप्सी ही झोपेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये व्यक्तीला जास्त झोप येते आणि कुठेही झोप येते. दिवसभर झोपेमुळे माणसाला थकवा जाणवतो आणि दिवसभर जांभई येत राहते.

निद्रानाश

निद्रानाश हा देखील झोपेशी संबंधित आजार आहे. या आजारात व्यक्तीला रात्रभर झोप येत नाही आणि झोप मध्येच झोपमोड झाली तर पुन्हा झोप येत नाही. त्यामुळे व्यक्तीला खूप थकवा जाणवतो आणि दिवसभर जांभई येत राहते.

जांभई का येते?

जास्त थकव्यामुळे जांभई येणे ही सामान्य गोष्ट आहे.

रात्री झोप न लागल्यामुळे जांभई येणे देखील सामान्य आहे.

दिवसभरातील आळस येत असल्यामुळे जांभई येते.

काहीवेळा वेळे आधी उठल्यानंतरही जांभई येणे सामान्य मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT