Morning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Tips: सकाळी उठल्यावर थकल्यासारखे किंवा अंगदुखी वाटत असेल तर दुर्लक्ष करू नका, वेळीच व्हा सावध

अनेक वेळा सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होतो. असे बरेचदा घडते कारण आपल्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता असते.

Puja Bonkile

Morning Tips: अनेकवेळा सकाळी उठल्याबरोबर आपल्याला अंगदुखी, थकवा, अस्वस्थता इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

जर तुम्हाला सतत अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील काही ना काही पोषक तत्वांची कमतरता असू शकते.

शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नसल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी जर तुम्हीही या समस्यांनी त्रस्त असाल, तर चला जाणून घेऊया शरीराला कोणत्या पोषक तत्वांची जास्त गरज आहे आणि त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

  • कॅल्शियमची कमतरता

अनेक वेळा आपल्याला अचानक चक्कर येणे, थकवा जाणवणे, स्नायू दुखणे किंवा अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असे बरेचदा घडते.

कॅल्शियम हाडे आणि दातांसाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि स्नायूंमध्ये समस्या सुरू होतात. चक्कर येणे, थकवा येणे आणि इतर लक्षणे ही या कमतरतेची लक्षणे आहेत. 

  • कोणत्या पदार्थांचे सेवन करावे

दूध

दही

चीज

खडे मीठ

वरील पदार्थांसारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

  • फायबरची कमतरता

शरीरात फायबरची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. फायबरच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेकदा थकवा येतो आणि चक्कर येते.

फायबरच्या कमतरतेमुळे होणारी समस्या टाळण्यासाठी आपल्या आहारात पुढील पदार्थांचा समावेश करावा.  फायबर हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. 

भाज्या

फळे

संपूर्ण धान्य आणि कडधान्ये

  • लोहाची कमतरता

अनेक लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता जाणवते. यामुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. लोहाच्या कमतरतेमुळे सकाळी उठल्यावर पुन्हा पुन्हा थकवा जाणवतो.

यासोबतच डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक किंवा दुहेरी दृष्टी येणे आदी लक्षणेही दिसतात.

  • कोणत्या पदार्थांचे सेवन करावे

पालक

बीन्स

अंडी

वरील पदार्थांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तरच थकवा आणि चक्कर येण्यापासून आराम मिळेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT