Eating Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Foods to Avoid in Morning: सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाल्यास बिघडू शकते तब्येत

सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणे टाळल्यास तब्बेत चांगली राहते.

दैनिक गोमन्तक

Foods to Avoid in Morning: सकाळी सर्वांना नाश्ता करायची सवय असते. नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.

पण तुम्ही रिकाम्या पोटी काही पदार्थ खातांना काळजी घ्यावी. कारण याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.

काही लोकांना नाश्त्यात जड पदार्थ खायला आवडतात. तर बरेच लोक आहेत ज्यांना हलके पदार्थ आवडतात. सकाळी नाश्त्यात काय खावे आणि काय नाही? हे जाणून घेउया.

  • चहा किंवा कॉफी

काही लोकांची सकाळ ही चहा आणि कॉफीने होते. पण हे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. सकाळी काहीही न खाता चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेये स्ट्रेस हार्मोन्स वाढवू शकतात.

Tea
  • लिंबूपाणी आणि मध

अनेक लोक सकाळी मध मिक्स करुन लिंबूपाणी पितात. आजकाल हे एक सामान्य पेय बनले आहे. लोकांचा असे वाटते की ते यामुळे वजन नियंत्रणात राहते.

आरोग्य तज्ञांनी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी मध मिक्स करुन पिऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण मधामध्ये जास्त कॅलरीज असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा जास्त असतो.

lemon honey
  • फळ

सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करु नये. इतर पदार्थांच्या तुलनेत फळे लवकर पचतात. यामुळे लवकर भूक लागते. काही लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यानेही अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

Fruits
  • दिवसाची सुरुवात करा एकदम फ्रेश! 

दिवसाचे पहिले काम

सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्यासाठी, सर्वप्रथम 10 ते 15 मिनिटे शांत ठिकाणी बसा आणि स्वत: ला वेळ द्या. आज कोणते काम, कसे करायचे याचा विचार करा. या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढण्याची योजना नक्की करा.

कृतज्ञता

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी कमतरता असते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही कोणत्या ना कोणत्या वंचिततेचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याकडे काय आहे ते आपण पाहावे आणि त्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या 15 मिनिटांत हे सर्व करू शकता.

व्यायाम

सकाळी थोडे चालणे किंवा हलका व्यायाम, योगासने किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीराला नवी ऊर्जा मिळते. पोटाच्या समस्या दुर होउन फ्रेश वाटते. यामुळे तुम्ही तुमचे काम पूर्ण एकाग्रतेने करू शकता आणि एकाग्रतेने केलेल्या कामाचे फळ नेहमी तुमच्या बाजूने येते. हा परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय साध्य करण्यात मदत करेल.

Good Morning Tips

संध्याकाळ

रोजच्या सकाळप्रमाणे संध्याकाळीही काही क्षण स्वतःसाठी काढा. ही वेळ किमान 30 मिनिटे असावी. जेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाचा विचार करू शकता.

आज काय बरोबर आणि काय चुकले, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आणि काय टाळायचे इत्यादींचा विचार करण्यास सक्षम व्हा. एकत्र, आपल्या कुटुंबासाठी योजना करण्यास सक्षम व्हा. जर काही राग किंवा चिडचिड असेल तर कागदावर लिहून फाडून टाका. जेणेकरून बाहेरचा राग घरच्यांवर उतरू नये.

कुटुंबासोबत वेळ घालवा

एकत्र जेवताना किंवा अन्न खाल्ल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी चालताना, काही वेळ आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत नक्कीच बसा. घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून त्यांचे सुख-दु:ख, काम, गरजा विचारा. यामुळे कुटुंबात एकता वाढते आणि तुम्हाला भावनिक सुरक्षितताही वाटते.

वेळेवर झोप

रात्री वेळेवर झोपा. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्हीपासून अंतर ठेवा. जेणेकरून मेंदूला सिग्नल मिळू शकेल की आता रात्र झाली आहे आणि मेंदू योग्य प्रमाणात मेलेनिन स्राव करू शकतो.

कारण जेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहता, लॅपटॉपवर काम करता किंवा मोबाइलवर व्यस्त असता तेव्हा डोळ्यांसमोर जास्त प्रकाश असल्याने मेंदूला त्रास होतो. म्हणून, झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे सर्व प्रकारच्या स्क्रीनपासून अंतर ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT