Morning Drink Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Drink: दूधाचा चहा नाही तर रोज सकाळी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक्स, पोटासंबंधित समस्या होतील दूर

जर तुम्ही हे हेल्दी ड्रिंक रोज सकाळी दुधाच्या चहाऐवजी पुढील पेय प्यायल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदे होतील. यामुळे मायग्रेन आणि अपचन सारख्या समस्या दूर राहतील.

Puja Bonkile

Morning Drink: हिवाळ्यात आरोग्याची खास काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, मायग्रेन आणि केस गळणे यासारख्या समस्या सामान्य होतात. अशावेळी जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे थोडे लक्ष द्यावे लागेल आणि चांगली लाइफस्टाइल निवडावी लागेल. 

दररोज सकाळी या हेल्दी ड्रिंकचे सेवन केल्यास अनेक गंभीर आजार दूर राहतील. हे पेय तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता, तुम्हाला ते बनवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. हे खास पेय बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि त्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया.

  • साहित्य

2- ग्लास पाणी

7- कढीपत्ता

3 - ओव्याचे पानं

1- टेबलस्पून धणे

1- टीस्पून जिरे

1- विलायची

1- तुकडा आलं

कृती

हे पेय तयार करण्यासाठी सर्वात पहिले एका पातेल्यात पाणी टाकून ते गरम करावे. पाणी उकळल्यावर त्यात कढीपत्ता, ओवा, धणे, जिरं, विलायची आणि किसलेले आलं वरील सर्व साहित्य टाकावे. यानंतर किमान पाच मिनिटे उकळवे. उकळी आल्यावर गाळून प्यावे.

कढीपत्ता

कढीपत्ता केस गळणे आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय, ते साखरेची पातळी कमी करते आणि हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करते.

ओव्याची पानं

ओव्याची पानं सूज येणे, अपचन, सर्दी, मधुमेह, दमा आणि वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

धणे

धण्याचे सेवन केल्याने चयापचय सुधारते, मायग्रेन, थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन देखील सुधारते.

जिरा

साखर, वजन कमी करणे, अॅसिडिटी, मायग्रेन, कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी जिरे फायदेशीर आहे. याच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्याही दूर होतात.

विलायची

याशिवाय मोशन सिकनेस, मळमळ, मायग्रेन, उच्च रक्तदाब आणि केस आणि त्वचेसाठीही विलायची खूप गुणकारी आहे.

आलं

आल्यामध्ये असलेले घटक अपचन, गॅस, वजन कमी करण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT