Paratha  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चीज पराठा, नोट करा रेसिपी

चीज पराठा झटपट तयार होत असून ते हेल्दी देखील आहे.

Puja Bonkile

Morning Recipe: सकाळच्या वेळी महिलांची धावपळ असते. या धावपळीत झटपट हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ नसतो. अशा वेळी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बनवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी रेसीपी सांगणार आहोत. जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत देखील आवडेल. चीज पराठा झटपट तयार होत असून ते हेल्दी देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी चीज पराठा कसा बनवायचा.

चीज पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- 1 कप गव्हाचे पीठ

- चीज स्लाईस

- ओरेगॅनो

- बारीक केलेली लाल मिरची

- मीठ

- बटर किंवा तूप

  • चीज पराठा बनवण्याची कृती

सर्वात पहिले गव्हाचे पीठ मळून घ्यावे. नंतर पीठाचा गोळा घ्यावा आणि त्याची पोळी लाटून घ्यावी. नंतर त्यात मधोमध एक चीज स्लाइस ठेवावे. स्लाइसच्या वर ओरेगॅनो मिक्स आणि बारीक केलेल्या लाल मिरच्या घालावे. तुम्ही चिली फ्लेस सुद्धा वापरू शकता. आता त्यावर चवीनुसार मीठ देखील घालावे.

ही पोळी चारही बाजूंनी फोल्ड करून चौकोनी बनवावी. वरून थोडे कोरडे पीठ शिंपडा आणि हलकेच लाटून घ्यावे. लाटून झाल्यावर त्यावर लसूण आणि बटर मिक्स लावावे. तवा गरम करून त्यावर तयार केलेला चीज भरलेला पराठा घालावा. बटर किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन भाजून घ्यावे. तुमचा टेस्टी चीज पराठा तयार आहे. तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा नुसताच सुद्धा सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT