Poha Cheela Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Poha Cheela Recipe: नाश्त्यात झटपट बनवा बनवा हेल्दी पोहा चिला!

सकाळच्या नाश्त्यात काही तरी वेगळे खायचे असेल तर ट्राय करा पोहा चिला!

Puja Bonkile

Healthy Recipe: ज्यांना पोहे आवडतात ते आवर्जून पोहे खातात. पण पोह्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून तुम्ही पोह्यापासून वेगळी रेसिपी ट्राय करायला हवी. तुम्ही पोह्याच्या चिल्याची उत्तम रेसिपी करून पाहू शकता. हे खायला खूप चवदार आणि बनवायला तितकेच सोपे आहे. तसे, तुम्ही पोह्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवत असाल. पण यावेळी पोह्यांची वेगळी चव चाखण्यासाठी तुम्ही पोह्यांची ही चवदार रेसिपी करून पाहू शकता. इन्स्टाग्राम वापरकरता @purna_recipes ने ही रेसिपी त्याच्या अकाउंटवर व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.


  • पोहा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 कप लाल पोहे

  • 1/3 कप बेसन

  • 1/3 ओट्स पावडर

  • 1टीस्पून किसलेले गाजर

  • 1 टीस्पून बारीक चिरलेला कांदा

  • 1 टीस्पून बारीक चिरलेला टोमॅटो

  • 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

  • 1हिरवी मिरची चिरलेली

  • 1 टीस्पून हळद

  • 1 टीस्पून लाल तिखट

  • 1 टीस्पून धनेपूड

  • चवीनुसार मीठ

  • देसी तूप

  • पोहे चिला बनवण्याची कृती

सर्वात पहिले पोहे धुवून घ्यावे.

नतंर दहा मिनिटे तसेच ठेवावे.

भिजल्यावर पोहे चांगले बारिक करावे.

नंतर त्यात बेसन आणि ओट्स पावडर मिक्स करावी.

नंतर पोह्यात गाजर, कांदे, टोमॅटो, हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालावी.

नंतर त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घालावे.

यामध्ये अर्धा कप पाणी घालुन सर्वकाही चांगले मिक्स करुन पीठ तयार करावे.

नंतर एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तूप लावून त्यावर दोन ते तीन चमचे पोह्याचे मिश्रण टाकावे.

तव्यावर गोल आकारात पसरवून चिला बनवा.

नंतर ते सोनेरी होईपर्यंत भाजू द्या आणि नंतर हलक्या हातांनी पलटून दुसऱ्या बाजूलाही भाजून घ्या.

तुमचा गरमागरम पोहा चिला तयार आहे.

टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर आस्वाद घेउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT