Oats Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Oats Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ओट्स डोसा

डायट करणाऱ्या लोकांसाठी हा चवदार नाश्ता फायदेशीर असु शकतो.

दैनिक गोमन्तक

Oats Dosa Breakfast Recipe: अनेकदा सकाळी नाश्ता करायला उशीर होतो. जर तुम्ही डायटवर असाल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही स्पेशल हेल्दी ब्रेकफास्ट करायचा विचार करत असाल तर नाश्त्यासाठी ओट्स डोसा तयार करु शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो.

त्याची तयारी करायला जास्त वेळ लागत नाही आणि फार अगोदर तयारी करावी लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया ओट्स डोसा कसा बनवायचा.

  • ओट्स डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप ओट्स

१/४ कप तांदळाचे पीठ

१/४ कप रवा

१/४ कप दही

अर्धा टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

एक कांदा

कढीपत्ता

कोथिंबीर

आल्याचा एक इंच लांब तुकडा

हिरव्या मिरच्या

आवश्यकतेनुसार पाणी

  • ओट्स डोसा बनवण्याची कृती

ओट्स डोसा बनवण्यासाठी आधी रेडी टू इट ओट्स घ्यावे. त्याची बारीक पावडर करा. एका मोठ्या भांड्यात काढावे आणि त्यात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करवे. तसेच चवीनुसार मीठ आणि जिरे घालावे. बारीक चिरलेला कांदा, आल्याचा तुकडा मिक्स करा.

सोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घाला. शेवटी दही घालून मिक्स करावे. आता या बॅटरमध्ये थोडे पाणी घालावे. ओट्स डोसामध्ये पाण्याचे प्रमाण तांदळाच्या डोस्यापेक्षा जास्त असावे. याचे बॅटर एकदम पातळ असले पाहिजे. आता हे बॅटर सेट होण्यासाठी अर्धा तास सोडावे.

आता तवा किंवा पॅन गरम करून त्यावर ओट्स डोसा पसरवा. काही वेळाने उलटा करून प्लेटमध्ये काढा. ओट्स डोसा पीठ पातळ असते, म्हणून ते तव्यावर पसरवण्याची गरज नाही. कोणत्याही चमचाच्या मदतीने तव्यावर टाका आणि सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंगावर शिजवा. नारळ किंवा शेंगदाणा चटणीसह गरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT