Morning Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा शेवयांचा उपमा

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी हेल्दी आणि झटपट खायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता.

Puja Bonkile

Sevai Upma Recipe: तुम्ही सकाळच्या नाश्त्यात रव्याचा उपमा खाल्ला असेलच हो ना!पण तुम्ही कधी शेवयांचा उपमा खाल्ला का? नाश्ता सकाळचा असो वा संध्याकाळचा हा उपमा दोन्हीसाठी बेस्ट पर्याय आहे.

तुम्हाला नाश्त्यात टेस्ट सोबत हेल्थही हवे असेल तर शेवया उपमा बनवु शकता. हा पदार्थ झटपट तयार होणारा असतो.

घरी बनवलेल्या गव्हाच्या, रव्याच्या शेवया पासून तुम्ही हा उपमा बनवू शकता किंवा बाजारात मिळणाऱ्या भाजेलल्या शेवया देखील घेऊ शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होते.

  • शेवयांचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- भाजलेल्या शेवया

- 1 लहान गाजर

- 1 लहान बटाटा

- अर्धा कप वाटाणा

- 1 मध्यम आकाराचा कांदा

- 1 लहान टोमॅटो

- 2 ते 3 हिरवी मिरची

- कोथिंबीर

- मोहरी

- लिंबाचा रस

- मीठ चवीनुसार

- तिखट

- हळद

- पाणी

- तेल

  • शेवयांचा उपमा बनवण्याची कृती

शेवयांचा उपमा बनवण्यासाठी शेवया पहिले नीट भाजून घ्यावे. आता उपमा बनवण्यासाठी सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या. हे सर्व एका बाजूला ठेवून द्या. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. आता एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी, कांदा आणि हिरवी मिरची टाका.

2 ते 3 मिनिटं भाजून घ्यावे. कांदा थोडासा ब्राऊनिश झाल्यानंतर यात टोमॅटो टाकावे. हे नीट शिजू द्यावे. साधारण 4 ते 5 मिनीटांनी यात गाजर, बटाटा आणि वाटाणा टाकावे. सोबतच थोडेसे पाणी टाकावे आणि काही वेळसाठी झाकून ठेवावे.

6 ते 7 मिनीट झाकण ठेवून शिजवल्यानंतर हे चेक करावे. नंतर यात तिखट, हळद, मीठ टाका आणि मिक्स करा. आता या शेवया टाका आणि थोडेसे पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवावे. आता या शेवया सर्व भाज्यांसोबत नीट शिजू द्यावे. 

काही वेळानंतर चेक करावे. जर सर्व नीट शिजले असेल तर झाकण काढून घ्या आणि त्यात राहिलेले पूर्ण पाणी सुकवा. आता यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. कोथिंबीरने टाकून गरमा गरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT