Egg Paratha Roll Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast Recipe: सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा 'Egg Paratha Roll', दिवसभर राहल एनर्जेटिक

दिवसभर भूक लागू नये म्हणून सकाळी काहीतरी हेल्दी आणि हेवी स्नॅक्स खायचा विचार करत असाल तर ही झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करावी.

Puja Bonkile

Egg Paratha Roll Morning Recipe: जर तुम्हाला सकाळच्या वेळी काहीतरी हेवी आणि पोट भरणारी डिश हवी असेल, तर एग पराठा रोल एकदम परफेक्ट आहे. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही.

प्रोटीनने समृद्ध असणारा हा नाश्ता आरोग्यदायी आहे. लहान मुले असो वा मोठे सर्वांना तेआवडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एग पराठा रोल बनवायला जास्त वेळ लागत नाही.

चला तर मग जाणून घेऊया एग पराठा रोल कसा बनवायचा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांसोबतही हा रोल तयार करू शकता.

Egg Paratha Roll बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 - वाट्या गव्हाचे पीठ

1- कप पाणी

1/2टीस्पून लसूण-आले पेस्ट

1/2 टीस्पून हळद

1 टीस्पून लाल तिखट,

1/2 टीस्पून जिरे पावडर

1/2 टीस्पून धने पावडर

1/2 टीस्पून गरम मसाला

1 चमचा लिंबाचा रस

2 चमचे दही

मीठ चवीनुसार

2 अंडी

बारीक चिरलेली कोथिंबीर

काळी मिरी

मेयोनीज

टोमॅटो केचप

देशी तूप

तेल

  • Egg Paratha Roll बनवण्याची कृती

सर्वात पहिले अंडी फोडून एका भांड्यात काढावे.

नंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे.

तसेच काळी मिरी आणि लाल तिखट घालावे.

बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे.

कढई गरम करून तेल घालावे.

अंडी घालून ऑम्लेट तयार करावे.

ऑम्लेट तयार झाल्यावर गॅसवरून उतरवे आणि पराठे बनवायला तयार करावे.

पराठे बनवण्यासाठी पिठाचा गोळा तयार करून पोळी लाटून घ्यावी.

त्यावर चिमूटभर मीठ आणि मिरी पावडर घाला.

एका चमच्यात देशी तूप घेऊन पोळीला लावा.

आता त्याला फोल्ड करा.

नंतर चमच्याने थोडं तूप लावून पुन्हा दुमडून त्रिकोणी आकार द्यावा.

हलक्या हातांनी लाटून घ्यावे.

तव्यावर ठेवा आणि तेल लावून भाजून घ्यावा.

सोबत केचपही लावा.

पराठ्यावर ऑम्लेट लावून रोल करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT