Breakfast Paneer Toast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Paneer Toast Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा चटपटीत पनीर टोस्ट!

पनीर टोस्ट बनवणे खूप सोपे आहे आणि ही रेसिपी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

Breakfast Paneer Toast Recipe: सकाळी नाश्त्यात काही तरी वेगळे खावंसे वाटते. पण अनेकजण फिटनेस फ्रिक असतात. अशा लोकांना काही तरी हेल्दी हवे असते. अशावेळी प्रथिनेयुक्त पनीर टोस्ट बनवू शकता.

पनीर टोस्ट अगदी सहज तयार केला जाऊ शकतो. पौष्टिक पनीर टोस्ट दिवसा नाश्ता म्हणूनही खाता येईल यासोबत मुलांच्या टिफिन बॉक्समध्येही देता येईल. पनीर टोस्ट बनवायला अगदी सोपी आहे. ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे. जाणून घेउया पनीर टोस्ट बनवण्याची पद्धत.

ब्रेड - 4-5

किसलेले पनीर - 1 कप

कांदा - 1/2

टोमॅटो - 1

आले-लसूण पेस्ट - 1 टीस्पून

सिमला मिरची - 1/2

लाल तिखट - 1/2 टीस्पून

हळद - 1/4 टीस्पून

टोमॅटो सॉस - 2 चमचे

बटर- 1 टेस्पून

बारिक चिरलेली कोथिंबीर - 2 टेस्पून

हिरवी चटणी - 4 टीस्पून

चिली फ्लेक्स - 1/2 टीस्पून

काळी मिरी पावडर - 1/4 टीस्पून

मीठ - चवीनुसार

  • कृती

सर्वात पहिले कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे.

यानंतर एका पातेल्यात बटर टाकून गरम करावे.

बटर वितळल्यानंतर त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या.

यानंतर पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट टाका आणि 1-2 मिनिटे परतून घ्या.

कांदा मऊ झाल्यावर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची टाकून तळून घ्या.

शिमला मिरची मऊ झाल्यावर त्यात टोमॅटोचे तुकडे घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

यानंतर या मिश्रणात हळद, तिखट आणि इतर मसाले मिसळा, नंतर चवीनुसार मीठ घाला.

सर्व साहित्य थोडा वेळ शिजवल्यानंतर त्यात टोमॅटो सॉस घालून मंद आचेवर परतावे.

मिश्रण शिजल्यावर त्यात किसलेले पनीर घालून मिक्स करून कोथिंबीर घाला.

पनीरचे मिश्रण तयार आहे.

आता एक ब्रेड घ्या आणि नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर लावून भाजून घ्या.

ते सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर पॅनमधून काढा.

आता ब्रेडच्या वर चटणी लावा आणि त्यावर पनीरचे मिश्रण पसरवा.

यानंतर टोस्टचे त्रिकोणी तुकडे करा.

नाश्त्यासाठी चविष्ट पनीर टोस्ट तयार आहे.

टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT