Monsoon TV Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon TV Care: पावसाळ्यात 'अशी' घ्या टिव्हीची काळजी, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

पावसाळ्यात इलेक्ट्रिक उपकरणे किंवा टीव्ही खराब होण्याच धोका अधिक असतो. पावसाळ्यात एक छोटीशी चुक महाग पडू शकते. पावसाळ्यात टिव्हीची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon TV Care: पावसाळा सुरू झाला असून उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पण पावसाळ्यात आरोग्याची आणि इतर गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.पावसाळ्यात टीव्हीचा वापर जपुन करावा. पावसाळ्यात एक छोटीशी चुक महाग पडू शकते. चला तर मग जाणून घेऊया की पावसाळ्यात टीव्हीची कोणती काळजी घ्यावी.

  • वायरिंग तपासावी

पावसाळ्यात (Monsoon) जेव्हा आपल्या परिसरातील वायरिंगला धोका निर्माण होतो, तेव्हा टीव्ही वापरण्यापूर्वी त्याची दुरूस्ती करून घ्यावी. एका इलेक्ट्रीशियनला बोलावून सर्व तपासून घ्यावे.

  • टीव्हीला ओलावापासून दूर ठेवावे

तुमच्या घरातील टीव्ही जर खिडकीजवळ असेल तर पावसाळ्यात खिडकी बंद ठेवावी. कारण ओलावा आल्यास टीव्हीचे नुकसान होऊ शकते.

  • टिव्हिचा स्विच तपासावा

पावसाळ्यात टीव्ही सुरक्षित ठेवायचा असेल स्विच आणि व्होल्टेजच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.  विज चमकत असेल तर टीव्ही बंद ठेवावा. अन्यथा टीव्हीचा स्फोट होऊ शकतो. तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तर टीव्हीचा मेन स्विच बंद करायला विसरू नका.

  • टिव्हीचा वापर करतांना हात कोरडे ठेवावे

पावसाळ्यात टीव्ही वापरत असताना तुमचे हात कोरडे असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. ओल्या हातांनी टीव्हीची बटणे, रिमोट किंवा टचस्क्रीनला स्पर्श करू नका. कारण यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT