Monsoon Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Travel Tips: पावसाळ्यात भटकंती करायचा विचार करत असाल तर बॅगमध्ये 'या' गोष्टी ठेवाच...

तुम्हीही पावसाळ्यात भटकंती करायला निघाले असाल तर या गोष्टी बॅगमध्ये असु द्या.

Puja Bonkile

Monsoon Travel Tips: पावसाळ्यात अनेक लोकांना भटकंती करायला आवडते. तर अनेक लोक पावसाळ्यात फिरालया जायचे म्हणून आतुरतेने पावासाची वाट पाहतात.जर तुम्हीही अशाच लोकांमध्ये असाल आणि पावसाळ्यात भटकंती करायाला विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडण्यापुर्वी बॅगमध्ये काही गोष्टी असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही पावसाचा बिनधास्त आनंद घेऊ शकता.

  • पावसाळ्यातील प्लास्टिक मोबाइल कव्हर

पावसाळ्यात (Monsoon) फिरायला गेल्यावर प्रत्येक क्षण आपल्याला जतन करून ठेवण्यासाठी मोबाईल वापरतो. यासाठी मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ घेतांना काळजी घ्यायाला हवी. पावसाळ्यात मोबाईल पाण्यात भिजू नये म्हणून प्लास्टिक मोबाइल कव्हर (Mobile Cover) वापरावी. यामुळे मोबाईल खराब होणार नाही.

  • छत्री किंवा रेनकोट

पावसाळ्यात भिजायला अनेक लोकांना आवडते.पण वारंवार पावसात भजत असाल तर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खास करून प्रवास करतांना भिजणे टाळावे.त्यामुळे पॅकिंग करतांना बॅगमध्ये रेनकोट किंवा छत्री छेवावी.

  • शू फ्रेशनर

पावसाळ्यात चप्पल पुन्हा-पुन्हा पाण्यात भिजत असताना त्यातून एक वेगळाच वास येऊ लागतो. हा वास तुम्हालाच त्रास देत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास देतो. त्यामुळे पॅकिंगच्या वेळी शू फ्रेशन ठेवावे. तसेच प्रवासादरम्यान शूज काढताना त्यात शू फ्रेशनर टाका. यामुळे तुमच्या शूजला कधीही दुर्गंधी येणार नाही.

  • वॉटरप्रूफ शूज

पावसाळ्यात प्रवासादरम्यान नेहमी वॉटरप्रूफ शूज घालावे. हे शूज वरून भिजत असले तरी ते आतून कोरडे राहतील आणि त्यामुळे तुम्हाला चालताना कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

  • औषधी

पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्ग होतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल पॅकमध्ये एक छोटा फर्स्ट एड बॉक्स ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला संपूर्ण बॉक्स ठेवायचा नसेल तर अँटिबायोटिक्स जरूर ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT