Monsoon Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Tips: पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? वापरा 'या' 5 ट्रिक्स

पावसाळ्यात खाद्यपदार्थांवर जर माशा बसत असेल तर कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Home Remedies For Fruit Fly: पावसाळा सुरू झाला असून तो आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराबरोबरच घराची स्वच्छता राखणे गरजेचे असेत. या गोष्टीची काळजी न घेतल्यास घरात अनेक छोटे किडे, माशा वाढू लागतात आणि ते अन्नपदार्थांनवर बून रोगराई पसरवतात.

या व्यतिरिक्त या हंगामातील खाद्यपदार्थांना भुंग्यापासून सर्वाधिक धोका असतो आणि त्यांना कोणतेही उघडे खाद्यपदार्थ आढळल्यास ते त्यावर घिरट्या घालू लागतात. अशावेळी, जर तुम्हाला कीटक आणि माशा घरापासून दूर ठेवायचे असतील, तर तुम्ही हे सोपे उपाय ट्राय करू शकता.

  • दालचिनी

घरातून मासा घालवण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडर पाण्यात मिक्स करून स्वयंपाकघरात फवारणी करू शकता. थोड्या वेळातच माशा नाहीसे होतील आणि दालचिनीचा प्रभाव होईपर्यंत ते पुन्हा येणार नाहीत. 

  • काळी मिरीचा वापर

जर माशा खाद्यपदार्थ किंवा फळांजवळ मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी काळी मिरी हलकी बारीक करून सुती कापडात बांधून पदार्थांजवळ ठेवावी. काळ्या मिरीच्या वासामुळे झुरळ देखील होत नाही.

  • कडुलिंबाचे तेल वापरावे

फळे (Fruits) किंवा अन्नावरील गूंजणारे बीटल दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरू शकता. यासाठी फळांना अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून त्यावर थोडे कडुलिंबाचे तेल शिंपडावे. 

  • अन्नपदार्थ झाकून ठेवावे

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थ चांगले झाकून ठेवणे खूप गरजेचे आहे. याशिवाय कापलेल्या भाज्या आणि फळं उघडी ठेवू नका, यामुळे किचनमध्ये माशा वेगाने वाढू लागतात. यामुळे फळं खाण्याआधीच चिरावे आणि लगेच खाऊन संपवावे.

  • डस्टबीन नेहमी साफ ​​ठेवावी 

पावसाळ्यात डस्टबिन रोज स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये जास्त वेळ कचरा घरात ठेवू नका. तसेच, स्वयंपाकघरात कचरा भरलेले डस्टबिन ठेवणे टाळावे. कारण घरात माशा वाढू शकतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT