Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Skin Care: पावसाळ्यातही सनक्रिन लावणं गरजेचं... कसं ते जाणून घ्या

सुर्यांच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी आपण सनक्रिनचा वापर करतो.

Puja Bonkile

Monsoon Skin Care: पावसाळ्यात आरोग्यासह त्वचेही काळजी घेणे गरजेचे असेत. अनेकजण उन्हाच्या किरणांपासून त्वचेची काळजी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का फक्त उन्हाळ्यात नाही तर पावसाळ्यात देखील सनस्क्रीनचा वापर करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

सनस्क्रीन उन्हाच्या किरणांपासून निघणाऱ्या अतिनिल किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यास मदत करते. त्यामुळे पावसाळ्यात देखील त्याचा वापर करणं गरजेचे आहे. उन्हाळ्या तसेच पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते.

  • सनस्क्रीन वापरताना कोणती काळजी घ्यावी

फक्त सनस्क्रीन लावून त्वचा सुरक्षित राहत नाही तर सनस्क्रीन लावताना कोणत्या टिका टाळ्या पाहिजे हे जाणून घेउया.

  • सावळ्या त्वचेवर न लावणे

डार्क त्वचा असलेल्या अनेक लोकांना वाटतं की, त्याना सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही. पण असं नाहीये. कारण सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे स्कीनच्या कोणत्याही टोनसाठी उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा.

  • सनस्क्रीन खरेदी करतांना एसपीएफची काळजी

सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफवर लक्ष देणे फार गरजेचे असते. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे एक रेटींग फॅक्टर आहे. कोणतं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत बचाव करते.

  • योग्य वेळ

अनेक लोक घरातून बाहेर पडतानाच सनस्क्रीनचा वापर करतात. पण अस करु नका. कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण 10 ते 15 मिनिट आधीच सनस्क्रीन लावावे. असे केल्याने सनस्क्रीनला त्याचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि नंतर याने तुमचा उन्हापासून बचाव देखील होतो.

  • सनक्रिन एकदा लावणे

सनक्रिन दिवसातून केवळ एकदाच लावणे पुरेसं आहे. तुम्हीही असं करत असाल तर हे चूकीचे आहे. सनस्क्रीन दोन ते तीन तासांनी पुन्हा लावायला पाहिजे. तसेच स्वीमिंग आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर सनस्क्रीनचा त्वचेवर लावावे.

  • केवळ उन्हात वापरावे

अनेक लोकांचा असा समज असतो की सनस्क्रीन केवळ उन्हातच फायदेशीर असते. कोणतेही वातावरण असो घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीनचा वापर करावा. कारण सनस्क्रीन कोणत्याही वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेतो.

  • पावसाळ्यात सनक्रिन कोणते वापरावे

पावसाळ्यात वॉटर रेजिस्टेंट सनस्क्रीनचा वापर करावा.

बाहेर फिरताना आपल्या बॅगेत सनस्क्रीन ठेवावे.

तीन तासांनंतर पुन्हा एकदा सनस्किन लावावे.

हाय एसपीएफच्या सनस्क्रीनची पावसाळ्यात लावणे टाळावे.

एसपीएफ 15 चा वापर करून सूर्याच्या किरणांपासून बचाव करता येतो.

पावसाळ्यात जेल बेस्ड सनस्क्रीमची निवड करावी.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

SCROLL FOR NEXT