Monsoon Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Skin Care: पावसाळ्यातही चेहऱ्यावर ग्लो हवा आहे? तर आतापासून 'या' 3 गोष्टींचा वापर सुरू करा

पावसाळ्यातही त्वचेची काळजी घ्यायची असेल तर आजपासूनच या तीन गोष्टी वापरने सुरू करा.

Puja Bonkile

Monsoon Skin Care: पावसाळ्या आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. अनेकांना पावसाळा खूप आवडतो. पण या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

त्याचबरोबर तेलकट त्वचेमुळे पावसाळ्यात फोड आणि पिंपल्सची समस्याही वाढते. अशा परिस्थितीत त्वचेची विशेष काळजी न घेतल्यास ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवू शकता. 

  • कोरफड जेल

कोरफड एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक ऋतूमध्ये चेहऱ्यावर लावली पाहिजे. त्वचा, केस आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावर (Face) कारफड जेल लावल्याने मुरुमांपासून सुटका मिळते. तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्माने समृद्ध कोरफड वापरल्याने त्वचेवर ग्लो कायम राहतो.

  • बटाट्याचा रस

बटाट्याचा रस चमकदार त्वचेसाठी फायदेशीर असतो. पावसाळ्यात बटाट्याचा रस लावावा. कारण अनेक समस्या दुर होतात. यासाठी बटाटा किसून घ्या आणि नंतर त्याचा रस गाळून घ्या. यानंतर बटाट्याचा रस मुलतानी मातीमध्ये मिसळून 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

  • चंदन पावडर

पावसाळ्यात चेहऱ्यावर चंदन पावडर लावणे फायदेशीर ठरते.  तुम्ही चंदनाचा पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचा चांगली राहते. तसेच चंदन पावडरचा वापर केल्याने टॅनिंग दूर होते आणि सुरकुत्याही कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT