Monsoon Immunity Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Immunity: पावसाळ्यात या पदार्थांचा आणि सवयींचा समावेश करणे आवश्यक

Monsoon Disease Prevention Tips: बदलत्या हवामानामुळे आणि संसर्गामुळे आजारी पडू नये म्हणून तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

देशात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. पावसळ्यात हवामानात अनेक बदल होतात. कडाक्याच्या उन्हानंतर पावसाळ्यात दिलासा मिळतो, पण या ऋतूतही अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या वातावरणामध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

बदलत्या हवामानामुळे आणि संसर्गामुळे (Virus) आजारी पडू नये म्हणून तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. तुमची ही प्रतिकारशक्ती रोजच्या आहारानेही (Diet) मजबूत राहू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात या उल्लेख केलेल्या गोष्टींचा समावेश करा आणि काही महत्त्वाच्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे.

* आल्याचा चहा

पावसाळ्यात (Monsoon) तसेच हिवाळ्यात आल्याचा चहा आरोग्यदायी (Health) ठरतो. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरिया, विषाणूंसोबतच सर्दी आणि फ्लूसारख्या समस्याही तुमच्यापासून दूर राहतात.

* हळदीचे दूध

श्रावणमध्ये (Shravan) दूध पिण्यास मनाई आहे. परंतु तुम्ही दुधामध्ये हळद मिक्य करून घेउ शकता. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि शरीराला आतून मजबूत करण्याचे काम करते.

* मुळेठी

मुळेठी हे आयुर्वेदिक औषध आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आणि पचनक्रिया बरोबर ठेवण्याचे काम करते. तसेच सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे रक्षण करते. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी लिकोरिस पावडर दुधासोबत घेऊ शकता. घ्यावयाच्या प्रमाणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण त्याचे प्रमाण तुमचे वय आणि आरोग्यानुसार बदलू शकते.

या सवयी लावा

* गुलण्या करणे

* दिनसातुन एकदा वाफ घ्यावी

* दिवसातून एकदा गरम पाणी प्या

* धावणे, चालणे आणि दोरीवर उडी मारणे

* योगा करावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT