Monsoon Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस अधिक गळताय? 'हे' उपाय करा

पावसाळ्यात केस खराब होऊ नये म्हणून खास काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात उन्हापासून दिलासा मिळतो. पण पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो.पावसाळ्यात आरोग्यासह केसांची आणि त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात केस चिकट होतात तसेच अदिक गळतात. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी पुढिल उपाय नक्की ट्राय करून पाहावे.

  • प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन

निरोगी केसांसाठी प्रथिने युक्त आहार घेणे गरजेचे आहे. याच्या मदतीने तुम्ही केसांचे मुळ मजबूत करू शकता. चीज आणि बीन्स इत्यादी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

  • सुकामेवाचे सेवन

झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असलेला आहार घ्यावा. अक्रोड, बदाम आणि काजू यांसारख्या सुक्यामेव्यांचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय, तुम्ही फॅटी अॅसिडने समृद्ध असलेल्या चिया बिया, मासे, टोफू आणि फ्लेक्स सीड्स इत्यादींचा समावेश करू शकता.

  • योग्य शॅम्पुचा निवड करावी

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केसांसाठी असा शॅम्पू निवडा ज्यामुळे केसांना कोणतीही हानी होणार नाही. केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडावा. केस निरोगी ही काळजी घेणे गरजेचे आहे.

  • इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा वापर टाळावा

पावसाळ्यात केस वाळवण्यासाठी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करु नका. जर तुम्ही केसांसाठी जास्त उष्णतेचे उपकरण वापरत असाल तर त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे करण्याचा प्रयत्न करा.

  • कोरफड जेल

केसांसाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. कोरफडमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. हे 3 जीवनसत्त्वे केस वाढवण्यासाठी आणि त्यांना चमकदार बनवण्याचे काम करतात. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिड सारखी जीवनसत्त्वे असतात. हे केस गळणे कमी करते

  • तेलाने मसाज करावी

पावसाळ्यात नियमितपणे केसांच्या मुलात मसाज करावी. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील. मसाज केसांना पोषण मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT