Monsoon Foot Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Foot Care: पावसाळ्यात पायांना घाण पाण्याचे इन्फेक्शन टाळण्यासाठी करा 'हे' 4 उपाय

पावसाळ्यात अनेक लोकांना घाण पाण्यामुळे इन्फेक्शनची समस्या जाणवते. यामुळे बाहेरून आल्यावर खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Foot Care: पावसाळा सुरू झाला असून उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पण पावसाळ्यात आरोग्यासह पायांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. खास करून पावसाळ्यात फिरणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावरील घाण पाणी पायावर उडाल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते.

  • पायांची नखे काढावी

पावसाळ्यात पायांची नखे वाढवू नका. कारण पायांची नखे वाढवल्याने त्यात घाण व ओलावा जमा होते. जास्तही नखे छोटी कापू नका, कारण छोटा काटा, किंवा ओरखडाही फंगल इन्फेक्शनला आमंत्रण देऊ शकते.

  • मीठाच्या पाण्यात पाय ठेवावे

पावसाळ्यात बाहेरून आल्यावर कोमत पाणी करून त्यात मीठ घालुन पाय ठेवावे. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घ्या, त्यात दोन चमचे मीठ टाका. सुमारे 20 मिनिटे या पाण्यात पाय ठेवा, नंतर साध्या पाण्याने पाय धुवा.

  • प्लास्टिक किंवा रबरची सॅडल वापरावी

पावसाळ्यात बाहेर जाताना प्लास्टिक किंवा रबरची सॅडल वापरावी. यामुळे पाय ओले राहणार नाही. कापडी शूज वापरू नका. यामुळे पायाला संसर्ग होऊ शकतो.

  • शरीराची स्वच्छता ठेवावी

पावसाळ्यात शरीराची स्वच्छता ठेवावी. घाम साचल्याने फंगल इन्फेक्शन वाढू शकते. यामुळे नियमित आंघोळ व शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करावा.

  • ओले कपडे वापरू नये

पावसाळ्यात त्वचेची काळजी घ्यावी. नियमितपणे आंघोळ करावी. पावसाळ्यात ओले कपडे, शूज वापरणे टाळावे.कारण यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.गरम पाण्याने कपडे धुवावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT