monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Morning Walk: पावसाळ्यात मॉर्निंग वॉक चुकू नये, यासाठी घरीच करा ‘हे’ उपाय

पावसाळा सुरू झाला असून अनेक लोकांना मॉर्निंग वॉकला जाता येत नाहीय.

Puja Bonkile

Monsoon Morning Walk: पावसाळा सुरू झाला असून अनेक समस्या देखील सोबत घेऊन आला आहे. पावसामुळे अनेक लोकांना मॉर्निंग वॉकला जाता येत नाहीय. पण पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

जर तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊ शकत नसाल तर घरीच काही उपाय करू शकता. यामुळे तुम्ही पावसाळ्यात देखील स्वत: ला देखील फिट आणि निरोगी ठेऊ शकाल.घरात कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

  • पावसाळ्यात घरात कसा व्यायाल करावा

पावसाळ्यात जर मॉर्निंग वॉकला जाता आले नाही तर तुम्ही घरात काम करतांना देखील वॉक करू शकता. जेव्हा गाणं ऐकता किंवा फोनवर बोलता तेव्हा वॉक करू शकता.

पावसाळ्यात निरोगी आणि फिट राहण्यासाठी तुम्ही गाणे ऐकत झुंबा करू शकता. तसेच स्किपिंग, जंपिंग जॅक आणि हॉपिंग यासारख्या अॅक्टिव्हिटीज देखील करू शकता.

पावसाळ्यात तुम्ही घरातल्या घरता व्यायम करू शकता. जसे की घराच्या बागेत किंवा एका रूम मधून दूसऱ्या रूममध्ये देखील जाऊ शकता. यामुळे पावसाळ्यात देखील तुमचे आरे्य चांगले राहिल.

तुमच्या घरात जर ट्रेडमिल मशिन असेल तर तुम्ही याचा वापर चालण्यासाठी करू शकता. यामुळे देखील पावसाळ्यात देखील वजन नियंणात राहिल.

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही घरातील सदस्यांसह किंवा मित्र-मैत्रिणींसोबत तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता. यामुळे शरीराची हालचाल होऊन तुम्ही फिट राहता.

रोजच्या कामात लिफ्टचा वापर न कराता पायऱ्यांचा वापर करावा. पायऱ्यां चढ-उतार करणे देखील व्यायामाचा एक प्रकार आहे. जेणेकरून शरीराची हालचाल होईल आणि कोणताच आजार बळावणार नाही.

मॉर्निंग वॉक करतांना थंड पाणी पिणे टाळावे. फक्त कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यानं पचन क्रिया चांगली होते.

नियमित चालणे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचे चांगले नियंत्रणात राहते. दिवसभर थोडे चालणे स्नायूंना सक्रिय बनवते. त्यामुळे ऋतू कोणताही असो निरोगी शरीराकरीता माॅर्निंग वाॅक करणे आरोग्यदायी आहे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT